महाराष्ट्र

महाराष्ट्रात चाललंय तरी काय? विरुद्ध दिशेने जाणाऱ्या भाजप नगरसेवकाची गाडी अडवली, पीएसआय ची कंट्रोल रुमला बदली…

छत्रपती संभाजीनगर

भाजपा माजी नगरसेवकाला चुकीच्या दिशेने जाऊ न दिल्याने पीएसआय ची कंट्रोल रूमला बदली करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. पोलिसाला कर्तव्य बजावल्याची शिक्षा मिळाली अशी प्रतिक्रिया या घटनेनंतर येत आहे
छत्रपती संभाजीनगर: रस्त्यांवर अपघात होण्यास बेशिस्त वाहतूक ही सर्वात जास्त जबाबदार आहे. बऱ्याच वेळेला वाहनचालक थोडीशी जागा मिळाल्यानंतर विरुद्ध बाजूने ओव्हरटेक करतात. विरुद्ध बाजूने ओव्हरटेक करणे, शाॅर्टकट्सचा वापर करणे असे प्रकार जीवघेणे ठरतात. वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन केल्यानंतर सर्वसामन्याकडून दंड आकारला जातो मात्र जर लोकप्रतिनिधींना सर्व नियम माफ आहे का? असा सवाल उपस्थित होत आहे. याचे कारण म्हणजे छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजपा माजी नगरसेवकाला विरुद्ध दिशेने जाऊ न दिल्याने पीएसआयची कंट्रोल रूमला बदली करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. पोलिसाला कर्तव्य बजावल्याची शिक्षा मिळाली अशी प्रतिक्रिया या घटनेनंतर येत आहे.
वाहन चालवताना वेग हा रस्त्याची स्थिती, रहदारी व वाहनाची स्थिती लक्षात घेऊन मर्यादित ठेवावा. अती वेगाने वाहन चालवल्यास अपघात होण्याची शक्यता असते. त्यामुळे अनेकदा वाहनचालकांची चिडचिड होते. त्यामुळे अनेकदा भांडणेदेखील होतात. हे सर्व प्रकार होत असताना वाहतूक पोलिसांचे काम वाहतुकीचे नियमन करण्यासाठी पोलिसांची नियुक्ती करण्यात येते. मात्र नियमांचे पालन करणाऱ्या पोलिसांवर कारवाई केल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.

नेमकं काय घडले?

१९ फेब्रुवारी रोजी शिवजयंतीनिमित्त आयोजित केलेल्या रॅलीमुळे छत्रपती संभाजीनगरमध्ये काही ठिकाणी नाकाबंदी करण्यात आली होती. शिवजयंतीला भाजपा माजी नगरसेवकाला साईड न जाऊ देणाऱ्या पीएसआयची कंट्रोल रूमला बदली करण्यात आली आहे. पोलिसांना कर्तव्य बजावण्याची शिक्षा मिळाली आहे. पोलीस आयुक्त मनोज लोहिया यांनी पीएसआय सचिन मिरधे यांची कंट्रोलला बदली केली आहे. शिवजयंतीच्या दिवशी मोटार सायकल रॅली भाजपा माजी नगरसेवक अनिल मकरिये हे विरुद्ध दिशेने जाऊ द्या अशी मागणी करत होते. पोलिसांनी अडवल्याने थोडी पोलिसांसोबत हुज्जत घातली. या प्रकरणात अदखलपात्र गुन्हा देखील दाखल झाला होता . मात्र भाजपा नगरसेवकाला विरुद्ध दिशेने जाऊ न दिल्याची आणि कर्तव्य बजावल्याची पीएसआय ला शिक्षा मिळाली आहे त्याची कंट्रोलला बदली केली गेली.
वाहतुकीचे नियम पाळावेत यासारख्या सूचना पोलिसांकडून दिल्या जातात. मात्र, लोकांचे प्रतिनिधीत्व करणारे नियम तोडत असतील तर त्यांच्यावर कोण कारवाई करणार. याची दखल कोण घेणार? असा सवाल या निमित्ताने उपस्थित होत आहे.

मुख्य संपादक : सुरज वानखडे

Featured

Advertisement

Advertisement

error: Content is protected !!