देश

भारतातून फेसबुक इंस्टाग्राम सह व्हॉट्सअँप होणार बंद ?

महाराष्ट्र – जनसूर्या मीडिया

सध्याच्या घडीला संपूर्ण जगभरातून फेसबुक, इंस्टाग्राम आणि व्हाट्सअँप वापरकर्त्यांची संख्या करोडोंच्या घरात पोहचली आहे. तसेच या संख्येत दिवसेंदिवस वाढ ही होत चालली आहे.
परंतु अशा काळातच भारतामध्ये लवकरच फेसबुक, इंस्टाग्राम आणि व्हाट्सअँप बंद होईल, या चर्चांनी जोर धरला आहे. सांगितले जात आहे की, एंड-टू-एंड एन्क्रिप्शन प्रायव्हसी या फीचरमुळे व्हाट्सअँप भारतात बंद होऊ शकते. कारण, हे फीचर भारत सरकारच्या २०२१ माहिती तंत्रज्ञान नियमांच्या विरोधात चालवले जात आहे. खरे तर, यामागे इतरही अनेक महत्त्वाची कारणे आहेत, ज्यामुळे फेसबुक, इंस्टाग्राम आणि व्हाट्सअँप भारतातून हद्दपार होऊ शकते. हीच कारणे आपण जाणून घेणार आहोत.

ही आहेत प्रमुख ५ कारणे

१) व्हाट्सअँप ने म्हणले आहे की, जर भारत सरकारकडून एंड-टू-एंड एन्क्रिप्शन फीचर काढून टाकण्यासाठी दबाव असेल तर आम्ही भारतातून बाहेर पडू.
२) सध्या आयटी नियम २०२१ च्या नियम ४ (२) अंतर्गत भारत सरकार आणि व्हाट्सअँप मध्ये हा सर्व वाद सुरू आहे. २०२१ च्या नियम ४ नुसार, सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला मेसेज आधी कोणी आणि कुठून पाठवला याची माहिती द्यावी लागेल. यालाच मेटा ने आव्हान दिले आहे.
३) याबाबत व्हाट्सअँप ने न्यायालयात सांगितले होते की, व्हायरल झालेल्या बातम्यांबाबत यापूर्वीच कारवाई करण्यात आली आहे. परंतु यात वापरकर्त्यांच्या गोपनीयतेच्या अधिकारांतर्गत कंपनी त्याचे एंड टू एंड एन्क्रिप्शन काढू शकत नाही. व्हॉट्सॲप, फेसबुक आणि इन्स्टाग्रामची मूळ कंपनी मेटा आहे. जर व्हाट्सअँप भारतात बंद झाले तर त्यामागे फेसबुक आणि इंस्टाग्राम हे अँप्स देखील बंद होतील.
४) महत्वाचे म्हणजे, भारतात सर्वात केंद्रस्थानी असलेल्या ॲपमध्ये व्हाट्सअँप चा समावेश आहे. आकडेवारीनुसार पाहिला गेलो तर, जगभरात व्हाट्सअपचे २.७८ अब्ज वापरकर्ते आहेत. या आकडेवारीत सर्वाधिक भारतीय वापरकर्त्यांचा समावेश आहे. यामध्ये मेटासाठी भारत सर्वात महत्वाचे आहे. कारण की, ५३५.८ दशलक्ष भारतीय वापरकर्ते मेटाशी जोडले आहेत.
५) व्हाट्सअँप हे ॲप फेब्रुवारी २००९ मध्ये लाँच करण्यात आले होते. व्हाट्सअपच्या पहिल्या व्हर्जनमध्ये अनेक क्रॅशिंग समस्या होत्या, त्यामुळे पुन्हा व्हाट्सअँप २.० ऑगस्ट २००९ मध्ये आयफोन द्वारे लाँच करण्यात आले. त्यावेळी ते २५०००० लोकांनी डाउनलोड केले होते, पुढे व्हाट्सअँप ॲप अँड्रॉइड वापरकर्त्यांसाठी ही उपलब्ध करण्यात आले. आता याचं व्हाट्सअँप ॲपचे भारतात करोडोपेक्षा अधिक वापरकर्ते बनले आहेत. अशा काळात व्हॉट्सॲप भारतात बंद झाले तर याचा फटका दोन्ही बाजूंना बसू शकतो.

मुख्य संपादक : सुरज वानखडे

Featured

Advertisement

Advertisement

error: Content is protected !!