दोन लाखांच्या मुद्देमालसह २ आरोपी अटकेत
बाभूळगाव प्रतिनिधी-
बाबुळगाव येथील आठवडी बाजारात बकऱ्या विक्रीसाठी आणणाऱ्या संशयित दोन आरोपीला बाबुळगाव पोलिसांनी ताब्यात घेत वीस बकऱ्यासह एक दुचाकी असा एकूण २ लाखाचा मुद्देमाल जप्त केला. सदरची कारवाई बाबळगाव पोलिसांनी २२ फेब्रुवारी रोजी सकाळी ६ वाजता दरम्यान केली. उमेश आनंद गायकवाड वय- ३६, प्रफुल अरुण चौधरी वय – २७ दोन्ही रा. कातखेडा देवळी, जिल्हा. वर्धा असे अटकेतील आरोपीचे नाव.
जप्त करण्यात आलेल्या चोरीच्या बकऱ्या
बाभूळगाव येथील पोलिसांचे पथक सकाळच्या सुमारास आठवडी बाजारात गस्त घालत असताना दोन तरुण संशयितरित्या आढळून आल्याने त्यांना विश्वासात घेऊन विचारले असता सदरच्या २० बकऱ्या या वर्धा जिल्ह्यातील हिंगणी गावातून चोरून आणल्याची आरोपीनी कबुली दिली. आरोपी चोरटयांनी या बकऱ्या बाभुळगाव बाजारात विक्रीकरिता आणले असून त्यांच्याकडून २० बकऱ्या अंदाजे १ लाख ६० हजार तसेच १ दुचाकी अंदाजे किंमत ४० हजार असा एकूण २ लाखाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. यापूर्वी बकऱ्या चोरी संदर्भात वर्धा जिल्ह्यातील सेलू पोलीस स्टेशन मध्ये गुन्ह्याची नोंद आहे.
सदरची कार्यवाही बाभुळगाव पोलीस स्टेशनचे ठाणेदार सुरज तेलगोटे सह पोलीस कॉन्स्टेबल अमोल खडसे, जमादार निसार खान, संजय कोहाड यांनी केली.
Post Views: 95
Add Comment