आ प्रताप अडसड यांची विधानसभेत मागणी
धामणगाव रेल्वे –
नांदगाव खंडेश्वर परिसरातील शेतकऱ्यांना अधिक सिंचनाचा लाभ होऊ शकते त्यामुळे साखळी उपसा सिंचनाच्या प्रस्तावाला मान्यता द्या तसेच अनेक वर्षापासून शेतकऱ्यांना हिवाळ्यात ओलितासाठी अप्पर वर्धा प्रकल्पाचे पाणी देण्यात येते मात्र त्या पाण्याचा अपव्य होतो त्या ऐवजी आता बंदिस्त पाईपलाईन द्वारे शेतीला सिंचनासाठीआधुनिक तंत्र वापरा अशी मागणी आ प्रताप अडसड यांनी विधानसभेत केली.
विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनाच्या अंतिम आठवड्याच्या प्रस्तावा दरम्यान बोलताना आमदार प्रताप अडसड यांनी विधानसभेत धामणगाव मतदार संघाचे अनेक प्रश्न त्यांनी विधानसभेत मांडले. केंद्र व राज्य शासनाने आरोग्याच्या अनेक सुविधा ग्रामीण भागात पुरवील्या आहेत. आज आरोग्य केंद्राच्या इमारती उभ्या आहेत साहित्यही प्राप्त झाले आहे. मात्र वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांची संख्या कमी असल्यामुळे आरोग्यसेवा पुरविण्यात यंत्रणेला त्रास होतो वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांची पदभरती त्वरित होणे गरजेचे आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्न पोटतिडकेने विधानसभेत मांडताना त्यांनी विधानसभा निवडणुकीच्या दरम्यान शेतकऱ्यांना त्रास देणाऱ्या केंद्राचे माहिती मांडली एकीकडे सोयाबीन ची खरेदी सुरू असताना धामणगाव व चांदुर रेल्वे येथील हे केंद्र मुद्दामपणे बंद करण्यात आले. या केंद्राची चौकशी करण्याची आग्रही मागणी त्यांनी प्रश्नोत्तराच्या तासात केली सीसीआयने सोयाबीन कापसाच्या आधारभूत किमतीने शेतमालाची खरेदी सुरू केली. नांदगाव खंडेश्वर मध्ये अद्यापही या केंद्राची सुरुवात झाली नाही हे केंद्र सुरू करावे. सोयाबीनची १२ टक्के आद्रता ही १५ टक्के करण्यात आली त्याप्रमाणे आदेश देण्यात यावे. सोयाबीनला लस्टर लॉस करिता शिथिलता देण्यात यावी ही सुद्धा मागणी केली. सध्या रब्बी हंगामात ओलित करताना मोटर ची गरज असते. भारनियमना नंतर विज आली की एकाच वेळी मोटर सुरू होते विजेचा दाब वाढल्याने डीपी व ट्रांसफार्मर जळतात त्यामुळे जिल्हा प्रशासनाकडे अधिक प्रमाणात डीपी व ट्रांसफार्मर ची उपलब्धता करून द्यावी सोलर ऊर्जा प्रकल्पाचे काम तातडीने करावे अशी मागणी आमदार प्रतापअडसड यांनी विधानसभेत केली.
ग्रामपंचायत इमारत बांधकामासाठी निधी द्या
ग्रामीण भागाचा केंद्रबिंदू हे ग्रामपंचायत आहे या ग्रामपंचायतच्या इमारती ४० ते ५० वर्षात शिकस्त झाल्या आहे सदर ग्रामपंचायत इमारती बांधण्यासाठी निधी उपलब्ध करून द्या शासनाने विद्यार्थीनींना मोफत शिक्षणाची व्यवस्था केली मात्र खाजगी अभिमत विद्यापीठाच्या विद्यार्थीनींना मोफत शिक्षणाची सुविधा मिळत नाही त्या विद्यार्थीनींना सुविधा करून देण्याची मागणी ही आमदार प्रताप अडसड यांनी विधानसभेत केली.
Post Views: 5
Add Comment