धामणगाव रेल्वे

राष्ट्रीय गोरक्षा मंचच्या महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षपदी हितेश गोरिया तर जिल्हाध्यक्षपदी विनय शर्मा यांची नियुक्ती

धामणगाव रेल्वे

राष्ट्रीय गोरक्षा मंच चे अमरावती जिल्हा अध्यक्ष पदावरून महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष पदी हितेश गोरिया यांची पदोन्नती करण्यात आली. तसेच विनय शर्मा यांची अमरावती जिल्हा अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. राष्ट्रीय गोरक्षा मंच चे अध्यक्ष मुरलीधर जी लव्हाडे यांच्या मार्फत हितेश गोरिया यांची नियुक्ती करण्यात आली. नेहमी गो मातेसाठी साठी झटत राहणारे व सदैव आपल्या हातून गोवंशाची रक्षा घडली पाहिजे या गोष्टींचे नेहमी भान ठेवून सतत कार्य करत राहणारे असे भूमी पुत्र हितेश गोरिया व विनय शर्मा यांचे नाव धामणगाव रेल्वे तालुक्यात प्रसिद्ध आहे. त्यांनी आता पर्यंत अनेक गोवंश व गायी कत्तलीस मोठ्या वाहनात जात असल्याचे दिसताच तसेच तशी माहिती मिळताच, आपल्या जीवाची पर्वा न करता त्या वाहनांचा पाठलाग करून त्यांना वाचवण्याचा प्रयत्न त्यांनी केलेला आहे.

विशेष म्हणजे अगदी ग्रामीण भागातील एका भूमी पुत्राची ही गोरक्षेची ओढ कौतुकास्पद आहे

मुख्य संपादक : सुरज वानखडे

Featured

Advertisement

Advertisement

error: Content is protected !!