आरोग्य विषयक

अल्पेश बन्सोड, शुभम खंडारकर यांनी ५० किमी स्वखर्चाने जात रक्तदान करून दिला माणुसकीचा संदेश

सर्वत्र होत आहे युवकांचे कौतुक

धामणगाव रेल्वे

अवघ्या १६ वर्ष्याच्या विद्यार्थिनीच्या दोन्ही किडनी निकामी झाल्याने तिला शस्त्रक्रिया साठी अमरावती येईल सुपर स्पेशालिस्ट रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सदर रुग्णाला बी निगेटिव्ह रक्तगटाची अत्यंत आवश्यकता असल्याची बातमी जनसूर्या च्या माध्यमातून प्रसारित करण्यात आली होती. त्यामुळे अनेक बी निगेटिव्ह रक्तदात्यांचे फोन आमच्यापर्यंत पोहोचले. तर रुग्णाच्या मदतीला धावण्यासाठी तत्पर असल्याचे काहींनी सांगितले.

अशामध्येच अल्पेश बन्सोड रा. रामगाव आणि शुभम खंडारकर रा. धामणगाव या दोन युवकांनी तातडीने स्वखर्चाने अमरावती गाठून रुग्णाला रक्तदान करीत पखाले कुटुंबाला मदतीचा हात दिला आहे. तर आजच्या युगातही या दोन युवकांनी समाजात माणुसकीचा संदेश दिल्याने सर्वत्र यांचे कौतुक करण्यात येत आहे.

मुख्य संपादक : सुरज वानखडे

About the author

मुख्य संपादक : सुरज वानखडे

Add Comment

Click here to post a comment

Featured

Advertisement

Advertisement

error: Content is protected !!