अमरावती

अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक संघाची जिल्हा परिषदेवर धडक

विविध मागण्यांसाठी धरणे आंदोलन

अमरावती, ता.९:-

अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक संघातर्फे जिल्हा परिषदेवर धडक देत विविध मागण्यांसाठी अखिल भारतीय शिक्षक संघाचे राज्य उपाध्यक्ष किरण पाटील,जिल्हाध्यक्ष गजानन चौधरी, सरचिटणीस सुभाष सहारे व आदींच्या नेतृत्वात शुक्रवारला (ता.९) धरणे आंदोलन करण्यात आले. दरम्यान मागण्यांचे निवेदन जिल्हा परिषदेच्या प्रशासनाला देण्यात आले.
जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने मागील एक वर्षापासून विस्तार अधिकारी, केंद्रप्रमुख, मुख्याध्यापक, विषय शिक्षक यापैकी एकही पदोन्नती न केल्यामुळे अमरावती जिल्हा परिषदेच्या ४५०० शिक्षकांपैकी एकाही शिक्षकाला पदोन्नती मिळालेली नाही. यासाठी अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाने वर्षभरात मा.मुख्य कार्यकारी अधिकारी व शिक्षणाधिकारी प्राथमिक यांना वेळोवेळी निवेदने दिलेली होती.तरीसुद्धा पदोन्नती प्रक्रिया न राबविल्या मूळे ही प्रक्रिया बाधित करणा-या घटकांवर कारवाई करण्यात यावी व संपूर्ण पदोन्नती प्रक्रिया एक महिन्यात पूर्ण करावी यासह प्राथमिक शिक्षकांच्या इतरही प्रलंबित प्रश्नांसाठी शुक्रवारला (ता.९) जिल्हा परिषद कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्याबाबतची नोटीस अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाने जि.प.प्रशासनास दिलेली होती. प्राथमिक शिक्षकांच्या इतर प्रलंबित प्रश्नांमध्ये निवडश्रेणीचा प्रश्न देखील असाच रखडला असून २४ वर्षांनंतर मिळणा-या निवड श्रेणीसाठी १९९२ ला प्राप्त असणाऱ्या प्राथमिक शिक्षकांपैकी एकाही प्राथमिक शिक्षकास अद्यापपर्यंत निवडश्रेणीचा लाभ मिळालेला नाही.याशिवाय शिक्षकांचे प्रलंबित वैद्यकीय देयके, विषय शिक्षकांना ४३०० रूपये ग्रेड पे लावण्यात यावा. २०१९ पासून प्रलंबित भविष्य निर्वाह निधीच्या हिशोबाच्या पावत्या मिळण्याबाबत सहाव्या व सातव्या वेतन आयोगाच्या वेतन निश्चितीस मान्यता देण्याबाबत. समग्र शिक्षा अभियानाचे अनुदान वेळेत जमा करण्याबाबत, सेवानिवृत्त शिक्षकांचे सर्व प्रकारचे लाभ वेळेत अदा करण्यात यावेत. सहाव्या टप्प्यातील बदली रद्द झालेल्या शिक्षकांना अवघड क्षेत्रातून कार्यमुक्त करण्यात यावे.


या सर्व मागण्यांसाठी शुक्रवारला (ता.९) जिल्हा परिषद कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले.या आंदोलनात शिक्षक भारती (प्राथमिक), डाॅ.पंजाबराव देशमुख शिक्षक परिषद, पुरोगामी प्राथमिक शिक्षक समिती, महाराष्ट्र जूनी पेंशन संघटने पाठिंबा दिलेला होता.आंदोलनात अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाचे राज्य उपाध्यक्ष किरण पाटील,जिल्हा अध्यक्ष गजानन चौधरी सरचिटणीस सुभाष सहारे, कार्याध्यक्ष संजय साखरे, कोषाध्यक्ष अशोक चव्हाण,राजाभाऊ होले,पंडितराव देशमुख, निळकंठ यावले, महीला आघाडी अध्यक्ष सुनिता पाटील, सरचिटणीस वृषाली देशमुख, सूरज मंडे, प्रशांत भगेवार,गजानन निर्मळ,राजेंद्र तामस्कर,मंगेश खेरडे, प्रभाकर झोड,गौरव काळे,मनोज चोरपगार, संजय वाटाणे, श्री पानतावणे, प्रमोद मांडवगणे, उज्ज्वल पंचवटे, भूषण बागडे,निखिल पाचघरे, बालपांडे, महेंद्र हीवे, संदीप खडेकर, प्रविण खरबडे, प्रफुल्ल ढोरे, सतीश गुजरकर, राजेश मुंधडा, साहेबराव परतेती, संदीप घाटे, रविकिरण सदाशिव, अरविंद महल्ले, महेंद्र हिवे, प्रफुल्ल भोरे, प्रविण शेंद्रे, संदीप देशमुख, विजय पवार, अमोल पोकळे, अरुण चव्हाण, राजेंद्र सावरकर, मदन उमक, सुधीर नितनवरे, व मंगेश वाघमारे, कमलाकर सारंग कदम, विकास रेखाते, ब्रम्हानंद कडू, दिनेश हेड, जामनिक, किशोर रुपनारायण संजय नागे, सुरेंद्र विघे, गौरव काळे, दिनेश नगरकर, प्रमोद घाटोड, देवराव अमोदे, नितीन पेढेकर, श्री.मनोहरे, अण्णा कडू, श्री नीचीत, कांचन कडू,अनिल खिराडकर यांच्यासह अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक संघाचीशिक्षक भारती (प्राथमिक), डाॅ.पंजाबराव देशमुख शिक्षक परिषद, पुरोगामी प्राथमिक शिक्षक समिती, महाराष्ट्र जूनी पेंशन
संघटनेचे जिल्ह्यातील पदाधिकारी व शिक्षक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

मुख्य संपादक : सुरज वानखडे

Featured

Advertisement

Advertisement

error: Content is protected !!