अमरावती

आकोटच्या शेतकऱ्यांचा अमरावती जवळ पोहरा घाटात अपघात ; एकाचा मृत्यू – इत्तर जखमी 

शेतकरी कुटुंबावर कोसळला दुःखाचा पहाड काही दिवसापूर्वीच झाला होता योगेश च्या वडिलांचा मृत्यू..

अमरावती प्रतिनिधी

अकोला जिल्ह्यातील बियाणे टंचाईने आज अकोट तालुक्यातील एका युवा शेतकऱ्याचा अमरावती जवळच्या रस्ता अपघातात “बळी” घेतला आहे.अमरावतीच्या पुढे पोहरा घाटात झालेल्या भीषण अपघात रॉग साईड येणाऱ्या टाटा नेक्सान या गाडीने स्वीफ्ट डिझायरला दिलेल्या जबर धडकेत अकोट तालुक्यातील मरोडा या गावातील तरुण शेतकऱ्याचा जागेवरच मृत्यू झाला असून इतर तीन जखमी आहेत.

पत्रकार सलील सच्चिदानंद काळे यांचे तातडीचे मदतकार्य …..गंभीर जखमी गावंडे परिवाराला केले जिल्हा सामान्य रुग्णालय अमरावती येथे भरती…

योगेश हरिदास गावंडे असे अपघातात मृत्यू झालेल्या युवकाचे नाव असून महेश गजानन गावंडे, शुभम गणेश गावंडे व अक्षय विठ्ठल गावंडे असे जखमीचे नाव आहे. जखमींना ईर्विन रुग्णालयात जिल्हा प्रतिनिधी सलील काळे व पोलिसांच्या मदतीने उपचारासाठी नेण्यात आले आहे.

अकोला जिल्ह्यात कपाशीचे अजित १५५ हे बियाणे पाहिजे त्या प्रमाणात मिळत नसल्याने यवतमाळ जिल्ह्यात ते मिळते अशी माहिती मिळाल्याने अकोट तालुक्यातील मरोडा या गावातील हे चार युवा शेतकरी बियाणे आणण्यासाठी चारचाकी वाहनाने निघाले होते. अकोला जिल्ह्यातील प्रशासनाच्या “हलगर्जीपणा”मुळे शेतकऱ्यांना पाहिजे ते बियाणे मिळत नसल्याची गेल्या आठ दिवसांपासून “बोंब” मारल्या जात असूनही, जिल्ह्यातील कृषी विभाग वा महसूल विभागाला जाग येत नसल्यामुळे आकोला जिल्ह्यातील शेतकरी हवालदिल झाला आहे.काल अकोल्यात केवळ बियाणे उपलब्ध होत नसल्याने ४६ डिग्री उन्हात शेतकरी महिला पुरुषांनी चक्क रस्ता रोको आंदोलन केले होते परंतु या नंतरही प्रशासन शेतकऱ्यांना अजित १५५ हे कपाशी बियाणे उपलब्ध करून देण्यास असमर्थ ठरले आहे.
हेच साढे आठशे रुपयांचे बियाणे १४०० ते १५०० रुपयांना ब्लॅक मार्केट मध्ये पाहिजे तेव्हढे मिळत आहे.कालच तेल्हारा तालुक्यातील कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी आडसुळ येथील एका दुकानदाराला रंगेहाथ पकडुन कारवाई केली आहे.
गेल्या महिन्यात पार पडलेल्या निवडणुकीच्या काळात “घसा फाडू फाडू”, “नरड्याला कोरड” येईपर्यंत “बोंबलणारे” सर्वच पक्षांचे राजकीय नेते आज शेतकऱ्यांच्या ह्या महत्त्वाच्या प्रश्नावर मात्र त्यांच्या “तोंडाला कुलूप” लावून “मुखरोग” झाल्यासारखे चूप बसले असल्याने जिल्ह्यातील शेतकऱ्यांमध्ये संताप व्यक्त केल्या जात आहे.प्रशासन आणखी किती शेतकऱ्यांचे “जीव घेणार” असा प्रश्न आज “युवा शेतकरी” विचारत आहे…

मुख्य संपादक : सुरज वानखडे

About the author

मुख्य संपादक : सुरज वानखडे

Add Comment

Click here to post a comment

Featured

Advertisement

Advertisement

error: Content is protected !!