कुणाकडे १२ तर कुणाकडे १७ गावांचा पदभार
धामणगाव रेल्वे –
मागील अनेक वर्षांपासून धामणगाव रेल्वे येथील कृषी विभागात सहाय्यक पदाची भरती नसल्यामुळे संपूर्ण तालुक्याचा कारोभार सांभाळण्याची धुरा फक्त १० कृषी सहाय्यकावर येवून पडली असल्याने अतिरिक्त चार्जमुळे या कृषी सहाय्यकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. धामणगाव येथील कृषी विभागामध्ये एकूण २४ कृषी सहाय्यकाचा स्टाफ असून त्यात अनेक वर्षांपासून भरती नसल्यामुळे सध्यस्थित फक्त १० कृषी सहाय्यक कार्यरत आहे. त्यामुळे उर्वरित १४ कृषी सहाय्यकाचा कामाचा ताण या कार्यरत कृषी सहाय्यकांवर असल्याने कुणाकडे १२ गावे तर कुणाकडे १७ गावे सांभाळण्याची जबाबदारी येवून पडल्याने शेतकऱ्याचे कामे वेळेवर होत नसल्याने अनेक शेतकऱ्यांच्या तक्रारी कार्यलयामध्ये येत आहे.
केंद्रातर्फे राबविण्यात येणारे अनेक प्रोग्राममध्ये सुद्धा हजर राहावे लागत असल्याने शेतकऱ्यांपर्यंत इतर सुविधा वेळेवर पोहचविता येत नाही, त्यामुळे आमच्याप्रती शेतकऱ्याच्या मनात राग निर्माण झाला असून त्यांचा रागाचा सामना आम्हाला करावा लागत असल्याने, कृषी सहाय्यक भरतीसाठी अनेकदा वरिष्ठांकडे मागणी करण्यात आली असून अद्यापपर्यंत कुणाचीही नेमणूक झाली नसल्याचे कृषी सहाय्यक यांनी सांगितले…
त्यामुळे सद्यस्थिती झालेल्या कृषी सहाय्यक परीक्षेमध्ये निवड झालेल्या सहाय्यकाची नेमणूक धामणगाव रेल्वे कृषी विभागात करण्यासाठी प्राधान्य द्यावे अशी मागणी कृषी सहाय्यक मार्फत करण्यात आली आहे..
Post Views: 183
Add Comment