धामणगाव रेल्वे

अखेर “प्रहार” च्या लढ्याला यश, घरकुल लाभार्थ्यांना मोफत वाळू चे वाटप सुरू

एम एच आयडी व सॅन्शन आयडी अभावी रजिस्ट्रेशन रखडले.

धामणगाव रेल्वे –

गेल्या कित्येक दिवसांपासून सुरू असलेला घरकुल लाभार्थ्यांचा वाळू साठी चा संघर्ष अखेर अंशतः थांबला. प्रहार जनशक्ती पक्षा द्वारे तहसिल कार्यालयावर दोन वेळेस धडकलेला घरकुल लाभार्थ्यांचा मोर्चा व त्यानंतर सतत च्या पाठपुराव्या ला अंशतः यश मिळाले. घरकुल लाभार्थ्यांना मोफत वाळू वाटपाची शेवटी सुरुवात झाली. परंतु अजुनही लाभार्थ्यांची पायपीट थांबता थांबेना. मोफत वाळू ची नोंदणी करण्यासाठी आधी घरकुल लाभार्थ्यांचा एम एच आयडी व सॅन्शन आयडी लिंक असणे आवश्यक असल्याने त्याखेरीज नोंदणी होत नाही, आणि सदर प्रक्रिया अतिशय संथ गतीने सुरू असल्याने लाभार्थ्यांची पायपीट थांबता थांबेना.

रजिस्ट्रेशन च्या नावाखाली तहसिल सेतु केंद्र चालकाकडून लाभार्थ्यांची आर्थिक लुट ?

ज्या लाभार्थ्यांची एम एच आयडी व सॅन्शन आयडी अपडेट झालेली असेल अश्या लाभार्थ्यांची तहसिल सेतु केंद्र चालकाकडून आर्थिक लुट सुरु असून प्रती नोंदणी मागे २०० रुपये फी ची आकारणी केल्या जात असून गरिब घरकुल लाभार्थ्यांची अक्षरशः लुट सुरु असल्याचे लाभार्थ्यांकडून बोलल्या जात आहेत.

अवैध वाळू विक्रीला तहसीलदारांचे अभय ? एक ट्रक वाळू ची १५ हजाराला विक्री.

एकीकडे घरकुल लाभार्थ्यांची लुट होत आहे तर दुसरीकडे तालुक्यातील अवैध वाळू विक्रीत जोरात सुरू आहेत. धामणगाव व मंगरुळ परिसरात एक ट्रक अवैध वाळू विक्री १५ हजाराला होत असून त्यासंबंधीचे पुरावे काही सुज्ञ लोकांकडे असल्याने तहसिलदार गोविंद वाकडे सदर बाबीकडे जाणुन डोळेझाक का करत आहेत असा प्रश्न उपस्थित केला जात आहेत.
तहसिलदार गोविंद वाकडे व जिल्हा खनिकर्म अधिकारी शेख यांच्या संशयी भूमिके मागे आर्थिक राजकारणाचा गंध दिसुन येत असल्याचे सुद्धा बोलल्या जात आहेत.

मुख्य संपादक : सुरज वानखडे

Featured

Advertisement

Advertisement

error: Content is protected !!