अमरावती : कासीम मिर्झा
न्याय पाहिजे असो अथवा अन्याय झाला असो सर्वसामान्य जनतेजवळ एकच पर्याय ते म्हणजे न्यायालय. न्यायालयात न्याय मिळण्याकरता बरीच वर्ष सातत्याने त्याचा पाठपुरावा कराल लागतो हे सर्वांना ठाऊक आहेचच. अमरावती जिल्ह्यातील चांदूरबाजार तालुका घाट लाडकी येथील करीमखा याने रे.दि.मु. क्र. २२०/१९९५ चा दावा जाहीर ठरावासाठी व कब्जा मिळण्यासाठी दाखल केला होता. सदरचा दावा नामंजुर झाला. त्यानंतर वादीने अचलपुर येथील मा. जिल्हा न्यायालयात रे.सि.अपील क्र. १५७/१९९८ दाखल केले. त्या अपीलाचा न्यायनिर्णय दि.१५.१२.२००५ मध्ये होवुन वादीस दावा मिळकतीचा कब्जा देण्याचा आदेश झाला. त्यानंतर प्रतिवादीने मा. उच्च न्यायालय, मुंबई खंडपीठ, नागपुर यांचे न्यायालयात दुसरे अपील क्र. २४७/२००६ दाखल केले. सदरचे अपील फेटाळण्यात आल्यानंतर वादीने ताबा मिळण्यासाठी सन २००६ मध्ये कायदेशीर अर्ज दाखल केला. त्यानंतर मुळ वादी मयत झाले व त्याचे वारसांनी वारसा हक्काने कायदेशीर लढा पुढे चालविली.
दरम्यानचे काळात वादी व प्रतिवादी यांच्या मध्ये तडजोड होण्याकरीता न्यायालयाने प्रयत्न केले. वादी व प्रतिवादी यांचेत तडजोड झाली व दावा मिळकतीचा ताबा वादीला मिळाल्याने वादीने आज झालेल्या लोक न्यायालयात सदर अर्जामध्ये तडजोड झाल्याने कायदेशीर रित्या अर्ज निकाली करण्याची विनंती केली. त्याप्रमाणे अर्ज निकाली निघाली व तब्बल २९ वर्षांनी वाद निकाली निघाला त्यामुळे संबंधीत पक्षकारांना पुष्पगुच्छ देवुन न्यायाधीशांतर्फे त्यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी जी.एम. नदाफ, जी.बी. नंदागवळे, डी.के. साहु, पी.एम. चव्हाण हे न्यायाधीश व न्यायालयीन कर्मचारी उपस्थीत होते.
Post Views: 70
Add Comment