क्राईम

अवैध सावकारांवर कारवाई – घराच्या झडतीत दीडशे जणांना बेकायदेशीर व्याजाने पैसे वाटप केल्याचे उघड

नाशिक जनसूर्या मीडिया –

मखमलाबाद येथील बेकायदा व्याजाने पैसे देणे दोन सावकरांना चांगलेच महागात पडले आहे. या दोघा सावकारांच्या घराची झडतीत सव्वाशे ते दीडशे जणांना बेकायदेशीरपणे अधिकच्या व्याजदराने पैश्यांचे वाटप करण्यात आल्याचे समोर आले आहे. या सावकारांनी काही कर्जदारांच्या मालमत्ता हडप करत फसवणुक केल्याचेही तपासात उघड झाले आहे. एका कर्जदाराने थेट सहकार विभागाकडे तक्रार केल्याने या सावकारांचे पितळ उघड पडले.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार प्रविण ज्ञानेश्वर काकड (३८ रा.मानकर मळा) व पोपट वसंत काकड (४१ रा.शांतीनगर मखमलाबाद) अशी संशयित सावकारांची नावे आहेत. याबाबत येवला जि.नाशिक येथील सहकारी संस्थाचे लेखापरिक्षक रविंद्र बाबाजी गुंजाळ (रा.पेठरोड) यांनी फिर्याद दिली आहे. निफाडचे सहकार निंबधक यांच्याकडे याबाबत रामदास दशरथ मोगल यांनी तक्रार केली होती. या तक्राची तात्काळ दखल घेण्यात येवून दोघा सावकारांच्या घरावर छापे टाकण्यात आले असता ते बेकायदेशीर व्याजाचा धंदा करीत असल्याचे समोर आले आहे. संशयिताच्या घरझडतीत सन. २००८ पासून बेकायदेशीररित्या व्याजाने पैसे वाटप केल्याचे प्रथमदर्शनी पुढे आले आहे.
दोघा सावकारांच्या घरात सव्वाशे ते दिडशे जणांना मोठ्या रकमेंचे वाटप करण्यात आले आहे. याबाबतचे ४४ करारनामे,४४ कोरे स्टॅम्प व अन्य पाच स्टॅम्प पेपर,१०७ धनादेश तसेच व्याज व कर्जाच्या नोंद असलेल्या तीन डाय-या मिळून आल्या आहेत. सावकारीचा परवाना नसतांना संबधीतांनी कर्जदारांकडून पाच टक्के दराने व्याज घेवूनही बहुतांश कर्जदारांच्या मालमत्ता कवडीमोल दराने हडप करीत कोट्यावधींची फसवणुक केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. अधिक तपास उपनिरीक्षक हाके करीत आहेत.

मुख्य संपादक : सुरज वानखडे

Featured

Advertisement

Advertisement

error: Content is protected !!