लखनऊ : जनसूर्या मीडिया
उत्तर प्रदेशातील मुजफ्फरनगरमध्ये अल्पवयीन मुलीवर बलात्कार करत तिची हत्या केल्याप्रकरणी आरोपीला १४ तासांत अटक करण्यात आली आहे. उत्तर प्रदेश पोलिसांनी नराधम्याला पकडले असून त्याच्यावर गोळीबार केला. या गोळीबारात आरोपीच्या दोन्ही पायांत गोळ्या लागल्या आहेत. याप्रकरणाचा पोलिसांनी तपास केला असता संबंधित नराधम हा आसामचा रहिवासी असल्याचे समोर आले.
इमानविल उर्फ सॅम्युअल असे नराधमाचे नाव असून त्याला पोलिसांनी अटक केली आहे. प्रसारमाध्यमानुसार, सीओ आशिष यादव यांनी चकमक झालेल्या घटनास्थळाची एकूण माहिती जाणून घेतली. याप्रकरणात त्यांनी सांगितले की, आरोपी मन्सूरपूर येथून फरार होण्याच्या प्रयत्नात होता. मात्र, त्याला चकमकीदरम्यान अटक करण्यात आली.
Post Views: 8
Add Comment