अमरावती प्रतिनिधी :-
अमरावतीच्या मोर्शी तालुक्यातील आडगाव विचोरी गावात जिल्हा परिषदेच्या शाळेतील ३२ विद्यार्थ्यांना विषबाधा झाल्याची घटना घडली आहे. मध्यान भोजन आहारामध्ये दिल्या जाणाऱ्या खिचडी आणि मटकी या पदार्थातून विषबाधा झाल्याची माहिती मिळाली आहे.
सहा विद्यार्थ्यांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती
दरम्यान, आरोग्य विभागाच्या पथकाकडून विषबाधा झालेल्या विद्यार्थ्यांवर गावात उपचार सुरू आहेत. शाळेतील ३२ विद्यार्थ्यांना विषबाधा झाली आहे. यामध्ये सहा विद्यार्थ्यांची प्रकृती चिंताजनक असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे.
दरम्यान, मुलांना विषबाधा झाल्याची माहिती मिळताच आड वडिल नातेवाईतांनी रुग्णालयात धाव घेतल्याचं पाहायला मिळालं. डॉक्टरांकडून मुलांची तपाशणी झाली आहे. ३२ पैकी २६ विद्यार्थ्यांची प्रकृती चांगली आहे. मात्र, ६ विद्यार्थ्यांची प्रकती चिंताजनक असल्याची माहिती मिळाली आहे. विद्यार्थ्यांना अन्नातूनच विषबाधा झाल्याचे उघड झाले आहे.
Post Views: 10
Add Comment