क्राईम

मांत्रिकासोबत शरीरसंबंध करण्यास नकार देत असल्याने पती व सासरच्यांकडून विवाहितेचा छळ

नाशिक – जनसूर्या मीडिया

मांत्रिकासोबत शरीरसंबंध करण्यास नकार देत असल्याने कर्जबाजारी पती व सासरच्यांकडून शारीरिक छळ होत असल्याची तक्रार विवाहितेने मुंबई नाका पोलीस ठाण्यात दिली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी, की पीडित युवती व तिचा पती यांचा विवाह सन २०१९ मध्ये झाला. ३६ वर्षीय पीडितेचे हे दुसरे लग्न असून, तिच्या ४० वर्षीय पतीचे तिसरे लग्न आहे. लग्नाच्या आधीपासूनच पीडिता होणार्‍या पतीसमवेत राहत होती. नवरा कर्जबाजारी असल्याचे तिला लग्नानंतर समजले. पीडितेचा नवरा नेहमी तिला मांत्रिकाकडे घेऊन जायचा व तो सांगेल तसे करण्यास सांगायचा.
लग्न झाल्यापासून पीडितेला तिच्या सासरच्यांकडून मारहाण व शिवीगाळ करीत तिचा मानसिक व शारीरिक छळ होत होता. पीडितेच्या नवर्‍याने तिला मांत्रिकासोबत शारीरिक संबंध प्रस्थापित करण्यास सांगितले होते. या गोष्टीला तिने नकार देताच त्याने रागाच्या भरात तिला पुन्हा मारहाण केली.
वडिलांचा फ्लॅट नावावर करून दे, माहेरून ५० लाख रुपये घेऊन ये, असे म्हणत ते तिला नेहमी त्रास द्यायचे. या गोष्टीला कंटाळून अखेर तिने पती, सासरचे पाच जण व मांत्रिक अशा सात जणांविरुद्ध तक्रार दिली. या प्रकरणी मुंबई नाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक गोडे करीत आहेत.

मुख्य संपादक : सुरज वानखडे

Featured

Advertisement

Advertisement

error: Content is protected !!