क्राईम

बोगस इ टॅग लावून गौवंश तस्करीचा चांदूर रेल्वे पोलिसांनी केला पर्दाफाश

१२ गौवंशाची सुटका, ७ आरोपी विरोधात गुन्हे दाखल

प्रतिनिधी –

शहरातून बोगस इ टॅग लावून राजरोसपणे गौवंशाची तस्करी करणाऱ्यावर कार्यवाही करीत बोगस इ टॅग चा भांडाफोड केल्याची घटना चांदुर रेल्वे पोलिसांनी उघडकीस आणली आहे. सदरच्या कार्यवाहीतून लहान मोठे १२ गौवंशाची सुटका करण्यात आली. चांदुर रेल्वे येथील पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे चिरोडी येथे नाकाबंदी केली असतां ४ लहान वाहनांमधून ८ पूर्ण वाढलेले व ४ लहान गौवंश आढळून आले. सदरच्या जनावराबाबत विचारणा केली असता मी स्वतः मालक असून शेतकरी असल्याची बतावणी करण्यात आली तसेच जनावरांना इ टॅग आणि खरेदी विक्रीच्या पावत्या जवळ असल्याच्या सांगण्यात आल्या. त्यामुळे थोडा वेळ का होईना ही गौवंशाची वाहतूक कायदेशीर असल्याचे जनावर मालकांकडून पोलिसांना सांगण्यात आले होते.

इ टॅग खोटे असल्याचे असा झाला भंडाफोड

तपासणी दरम्यात खरेदी विक्रीच्या पावत्या कृषी उत्पन्न बाजार समिती मधील असल्याचे समजले. तसेच जनावरांना इ टॅग असताना देखील गौवंश तस्करांना आपला खेळ उलटा पडेल असे वाटत नव्हते मात्र जनावरांना लावण्यात आलेले इ टॅग ची ऑनलाईन चाचपणी केली असता कुठेही नोंद मिळून आली नाही. त्यानंतर मात्र पोलिसी खाकी दाखवताच संपूर्ण गौवंश कत्तलीसाठी नेत असल्याचे कबुल करण्यात आले. त्यामुळे जप्त करण्यात आलेल्या १२ गौवंशाला जीवदान देण्यात आले. तसेच ७ आरोपी विरोधात कलम ३१८ (२ ),३ (५ ) बी, एन, एस ११, (१), (घ), (ड) प्राणी क्रूरता कायदा -१९६०,५(अ), ५(बी) महा.प्राणि संरक्षण आधि. १९९५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जिल्ह्यासह शहरात सुद्धा मोठ्या प्रमाणात बोगस पद्धतीचा अवलंब करून कत्तलीकरिता गौवशाची तस्करी करण्यात येत आहे. तर धामणगावात सुद्धा अशा पद्धतीचे कामे होत असल्याने गौरक्षकांनी सदर घटनेवरून तत्पर असणे गरजेचे झाले आहे तर कुठेही अशा प्रकारे गौवंशाची वाहतूक होत असल्याने निदर्शनास आल्यास आमच्यासंपर्क साधण्याचे आवाहन यावेळी अमरावती येथील प्रख्यात गौरक्षक अजितपाल मोंगा यांनी दिली..

मुख्य संपादक : सुरज वानखडे

Featured

Advertisement

Advertisement

error: Content is protected !!