अपघात

मित्र पोलीस झाल्याची पार्टी बेतली जीवावर ; ४ जीवलग मित्रांचा दुर्दैवी मृत्यू

जनसूर्या मीडिया

लातूरमध्ये भीषण अपघातामध्ये ४ जीवलग मित्रांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. मित्राची पोलिस भरतीमध्ये निवड झाली म्हणून जेवणाची पार्टी करण्यासाठी हे ४ मित्र गेले होते.
पार्टी करून घराच्या दिशेन परत येत असताना भरधाव कार आणि ट्रकची समोरासमोर धडक झाली. या भीषण अपघातामध्ये तिघांचा जागीच मृत्यू झाला तर एकाचा रुग्णालयामध्ये मृत्यू झाला. हा चारही जण लातूरच्या रेणापूर तालुक्यातील कारेपूर गावचे होते. त्यांच्या मृत्यूमुळे कारेपूर गावावर शोककळा पसरली आहे.
लातूरच्या कारेपूर गावातील तरुण अजीम पाशामिया शेख याची पुण्यातील दौंड येथे एसआरपीआय पदावर निवड झाली होती. याचाच आनंदोत्सव साजरा करण्यासाठी सोमवारी रात्री कारेपूर गावातील ६ मित्र कारने बीडजवळच्या मांजरसुंबा येथे गेले होते. जेवणाची पार्टी झाल्यानंतर ते सर्वजण संभाजीनगर- लातूर राष्ट्रीय महामार्गावरून परत येत होते. त्यावेळी बीड जिल्ह्यातल्या वाघाळापाटी येथे कार आणि ट्रकची समोरासमोर धडक झाली.
या भीषण अपघातामध्ये चार तरुणांचा जागीच मृत्यू झाला. बालाजी शंकर माने (वय २७), दीपक दिलीप सावरे (वय ३० ), फारुख बाबू मिया शेख ( वय ३० ) आणि ऋतिक हनुमंत गायकवाड (वय २४) यांचा मृत्यू झाला. तर अजीम पाशामीया शेख (३०) व मुबारक सत्तार शेख (२८) हे दोघे जण गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
एकाच गावातील चौघांचा मृत्यू झाल्यामुळे शोकाकुल कारेपुरात चूल पेटली नाही. अपघातात मृत्यू झालेल्यापैकी बालाजी दोन दिवसांत बाबा होणार होता. या अपघातात ठार झालेल्या बालाजी मानेची पत्नी बाळंतपणासाठी गावी गेलेली असून डॉक्टरांनी दोन दिवसांनंतरची तारीख दिलेली आहे. तर चार बहिणीनंतर जन्मलेला फारुख शेखच्या निधनाने घरातील कर्ता मुलगा गेल्यामुळे गावात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
कारेपूर येथील बालाजी माने या २७ वर्षीय तरुणाचे गतवर्षी लग्न झालेले होते. पुढील दोन दिवसांत डॉक्टरांनी त्याच्या पत्नीला बाळंतपणाची तारीख दिलेली होती. बाप होण्याचे त्याचे स्वप्न लवकरच साकार होणार होते. पण त्यापूर्वीच त्य चार बहिणीनंतर जन्मलेला फारुख शेख या ३० वर्षीय युवकाला एक वर्षाची मुलगी आहे. २८ वर्षीय दिपक सावरे याला १ वर्षाचा मुलगा असून ज्या गाडीचा अपघात झाला. ती गाडी चालवून तो घर चालवत होता. अविवाहीत असलेला २७ वर्षीय युवक ऋत्विक गायकवाड हा शेती आणि टोमॅटोचा व्यवसाय करत होता.

मुख्य संपादक : सुरज वानखडे

Advertisement

Advertisement

error: Content is protected !!