धक्कादायक

नागपुरात पोलीस उपनिरीक्षकाला धक्काबुक्की ; घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल

नागपूर : जनसूर्या मीडिया

गेल्या काही दिवसांत पोलिस अधिकाऱ्यांना भररस्यात हाणामारी करण्याच्या घटना घडत आहेत. त्यात सध्या नागपूर येथे एका पीएसआयला धक्काबुक्की करण्यात येत असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या घटनेप्रकरणी धक्काबुकक्की करणाऱ्या आरोपीला अटक करण्यात आलेली आहे.

नक्की काय घडले?

व्हायरल होत असलेली संपूर्ण घटना नागपूर येथील आहे. जिथे ३० वर्षीय अश्विन गेडाम हे गुरुवारी रात्री आपल्या मामाच्या घरून परत येत असताना दुचाकी घसरल्यामुळे रस्त्याच्या बाजूला असलेल्या खोल खड्ड्यात पडले. या अपघातात त्यांच्या मृत्यू झाला.
अपघाताची बातमी पोलिसांना मिळतात वाठोडा ठाण्याचे उपनिरीक्षक कृष्णा साळुंखे ताफ्यासह शुक्रवारी सकाळी घटनास्थळी पोहोचले, त्यानंतर घटनास्थळी नागरिकांची गर्दी झाली, पंचनामा करताना पोलिसांना अडचण येत असल्याने त्यांनी नागरिकांना तेथून जाण्यास सांगितले. त्यातच बाबा बोकडे हा व्यक्ती संतप्त झाला. त्याने साळुंखे यांच्याशी वाद घालणे सुरू केले. दरम्यान बोकडे येणे पीएसआय कृष्णा साळुंखे यांना शिवीगाळ करून धक्काबुक्की सुरू केली.
सध्या या घटनेता व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून यानंतर पोलिसांनी आरोपी बाबा बोकडे विरुद्ध पोलीस अधिकाऱ्याला मारहाण करणे, धमकी देणे आणि शासकीय कामात अडथळा निर्माण करणे गुन्हे दाखल केले. मात्र सध्या संपूर्ण व्हिडिओ इन्स्टाग्राम या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरील ‘SaamTvNews’ या अकाउंटवर पोस्ट करण्यात आलेला आहे.
टीप : हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.

मुख्य संपादक : सुरज वानखडे

About the author

मुख्य संपादक : सुरज वानखडे

Add Comment

Click here to post a comment

Advertisement

Advertisement

error: Content is protected !!