धामणगाव रेल्वे

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आ प्रताप अडसड यांनी दिल्या शुभेच्छा

देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेताच धामणगावात कार्यकर्त्यांनी साजरा केला आनंदोत्सव

धामणगावात ढोल ताशे वाजले; फटाके फुटले; तीन क्विंटल लाडू चे वाटप

धामणगाव रेल्वे
राज्याचे लाडके नवनियुक्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेताच धामणगाव तालुक्यात मोठ्या प्रमाणात जल्लोष करण्यात आला असून ढोल ताशे सह  फटाके फोडण्यात आले तसेच तीन क्विंटल लाडू चे वाटप करण्यात आले.
आज रोजी देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेताच, महायुती भाजपा पदाधिकारी, कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साह संचारला होता. स्थानिक शास्त्री चौकात भाजपाचा विजय साजरा केला आमदार प्रतापदादा तुम आगे बढो अशा घोषणा देत, ढोल ताशे, फटाक्यांची आतषबाजी आणि लाडू वाटून देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्याचा आनंद साजरा करण्यात आला. दरम्यान आ प्रताप अडसड यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना शुभेच्छा दिल्या धामणगाव रेल्वे विधानसभा मतदार संघावर भाजपाने सलग दुसऱ्यांदा झेंडा फडकवला आहे.
प्रताप अडसड आमदार म्हणून पुन्हा निर्वाचित झाल्याने भाजपाचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साह आणि आत्मविश्‍वास आहे.

मुख्य संपादक : सुरज वानखडे

Featured

Advertisement

Advertisement

error: Content is protected !!