महाराष्ट्र राजकीय

बॅलेट पेपर मतदान प्रकरण ; मतदान प्रक्रियेसाठी पुढाकार घेणाऱ्यांवर गुन्हे दाखल

मारकडवाडीतील १७ जणांसह १०० ते २०० ग्रामस्थांविरोधात गुन्हे दाखल

सोलापूर – जनसूर्या मीडिया

सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यातील मारकडवाडी गावात बॅलेट पेपरने फेर मतदान रोखण्यात आलं होतं. पण आता मारकडवाडी येथील ग्रामस्थांच्या विरोधात अखेर पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहे. मतदान प्रक्रियेसाठी पुढाकार घेणाऱ्या मारकडवाडीतील १७ जणांसह अन्य १०० ते २०० ग्रामस्थांच्या विरोधात गुन्हे नोंदवले आहे.
विधानसभा निवडणुकीच्या निकालावर परिणाम करण्याच्या उद्देशाने ईव्हीएम मशीन संदर्भात अफवा पसरवून फेर मतदानाची तरतूद नसताना प्रशासनाचे आदेश डावलल्याप्रकरणी हे गुन्हे दाखल केले आहे. तसंच बॅलेट पेपरवर मतदान करण्यासाठी नागरिकांना आवाहन करून भीती निर्माण करत समाजात द्वेषाची भावना निर्माण केल्याचाही आरोप करण्यात आला आहे. बीएनएस ३५३ (१) (ब), १८९ (१), (२), १९०, २२३ सह महाराष्ट्र पोलीस अधिनियम १३५ प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आले आहे. माळशिरसच्या नातेपुते पोलीस ठाण्यात सर्व आरोपींच्या विरोधात गुन्हा दाखल केले आहे.

या गावातील आरोपीवर दाखल केले गुन्हे?

1) संजय हरिभाऊ वाघमोडे
2) राजेद्र अंकुश मारकड
3) वैभव वाघमोडे
4) विजय वाघमोडे
5) विलास आद्रट
6) रणजित जिजाबा मारकड
7) लक्ष्मण सिताराम मारकड
(8) सर्जेराव बाबुराव लोखंडे
(9) संदिपान आण्णा मारकड
10) अमित वाघमोडे
11) दत्तु राघु दडस
12) आबा नाना मारकड
13) बबन दादा वाघमोडे
14) मारुती शंकर रणदिवे
15) नानासाहेब मारकड
16) संजय नरळे
17) शरद कोडलकर. सर्व रा. मारकडवाडी.
18) इतर १०० ते २०० लोक

नाना पटोलेंची संतप्त प्रतिक्रिया

दरम्यान, मारकडवाडीतलं मतदान रोखल्यावरुन नाना पटोलेंनी एका पत्रकातून जोरदार टीका केली. “मारकडवाडीमध्ये प्रशासन अत्याचारी ब्रिटिशांप्रमाणे वागले, त्यामुळे ईव्हीएम आणि निष्पक्ष निवडणूक प्रक्रियेवर जे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे ते अधिक गडद झाले आहे. ‘कर नाही तर डर कशाला?’ याप्रमाणे प्रशासनाने हे मतदान पार पडू द्यायला हवे होते, पण भाजप सरकारच्या काळात सर्व सरकारी यंत्रणाच दबावाखाली काम करत आहे. त्यामुळे सोलापूर पोलिसांनी त्यांना ‘वरून’ आलेल्या आदेशाची फक्त अंमलबजावणी केली. मारकडवाडीत प्रशासकीय यंत्रणेच्या माध्यमातून जनतेचा आवाज दाबण्याचाच प्रकार झाला आहे आणि हाच लोकशाही व संविधानाचा खून आहे” अशी टीका नाना पटोलेंनी केली.

काय आहे प्रकरण?

मारकडवाडी गावात उत्तम जानकरांना कमी मतं मिळाल्याने बॅलेटवर मतदानाची मागणी झाली. मारकडवाडीचं एकूण मतदान आहे २ हजार ४७६. विधानसभा निवडणुकीत मतदान झालं १ हजार ९०५ यापैकी १००३ मतं पडली राम सातपुतेंना तर ८४३ उत्तम जानकरांना. त्यामुळे गावातील लोकांनी बॅलेटवर मतदानाची मागणी केली.

मुख्य संपादक : सुरज वानखडे

Featured

Advertisement

Advertisement

error: Content is protected !!