८ गोल्ड, ५ सिल्वर, ७ ब्रॉन्झ सह पटकावले २० मेडल्स
धामणगाव रेल्वे
मागील काही वर्षांपासून फक्त महाराष्टरातच नाही तर इतर राज्यात सुद्धा आपल्या कौशल्याची छाप बोधी बुडोकान कराटेचे विद्यार्थ्यां सोडत आहे. त्यात आणखी एक भर म्हणून हैदराबाद येथे आयोजित द्वितीय नॅशनल कराटे चॅम्पियनशिप मध्ये एक दोन नव्हे तर तब्बल २० मेडल्स आपल्या नावी करून धामणगाव नगरीच्या शिरपेचात मनाचा तुरा या विध्यार्थ्यानी रोवला आहे.
नोव्हेंबर महिन्यात द्वितीय नॅशनल कराटे चॅम्पियनशिप हैदराबाद येथे आयोजित करण्यात आली होती. यामध्ये धामणगाव रेल्वे येथील बोधी बुडोकान कराटेचे विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला होता. त्यात ८ गोल्ड, ५ सिल्वर आणि ७ ब्रॉन्झ मेड विद्यार्थ्यांनी पटकावले असून धामणगावचे नाव आणखी उंचावले आहे. यात लावण्या कुंभरे, आराध्या देऊळकर,परी लांबट, प्रज्वल कांबडी, हर्षित गोरिया, पूर्वा रोहणे, क्षारंगधर गुप्ता यांनी गोल्ड मेडल तर रोहन खोब्रागडे, खुशी साहू, रुकिया बोहरा, अंतरा ताडाम, पायल कांबडी यांनी सिल्वर मेडल तसेच अद्विका कांबळे, जयेश यादव , प्रसन्न पाटील, जानवी राऊत, शाश्वत गुप्ता, अजिंक्य इंगळे यांनी ब्राँझ मेडल आपल्या नवी केले आहे.
विद्यार्थ्यांचे मनोबल उंचावण्यासाठी तसेच त्यांना आणखी प्रेरित करण्यासाठी दत्तापूर येथील महिला पोलीस कॉन्स्टेबल मनोरमा डोंगरदिवे यांच्या हस्ते मेडल व सर्टिफिकेट प्रदान करण्यात आले. तर या सर्व विजयाचे श्रेय विद्यार्थ्यांनी बोधी बुडोकान कराटे मास्टर भंते धम्मसार, मास्टर मुकेश कांबळे, आकाश पवार, सचिन मून, संध्या पवार, सचिन चौधरी, सम्यक दहाट, सोनाली गुप्ता, प्रतिभा नागलवाडे, साक्षी अटलकर याना दिले. याशिवाय पालकांनी व धामणगावातील नागरिकांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या..
Post Views: 13
Add Comment