आरोग्य विषयक धामणगाव रेल्वे

पखाले कुटुंबियांकडून मुलीच्या शस्त्रक्रियासाठी नागरिकांकडे मदतीची हाक

धामणगाव रेल्वे –

अमृता छगन पखाले वय – १६ वर्ष, रा. रामगाव हि विद्यार्थिनी से.फ.ला हायस्कुल धामणगाव रेल्वे येथे इय्यता ११ वी मध्ये शिकत असून या विध्यार्थानीच्या दोन्ही किडनी निकामी झाली असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे. करिता हिला उपचाराकरिता सुपर स्पेशालिस्ट ( अमरावती ) रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. डॉ. कडून सदर बाबीची माहिती मिळताच पालकांना मोठा धक्काच बसला आहे.

              अमृताचा रक्तगट बी निगेटिव्ह असून सध्यस्थितीत या रक्तगटाची तिला अत्यंत आवश्यकता आहे. तरी बी निगेटिव्ह या रक्तदातांनी सुपर स्पेशालिस्ट ( अमरावती ) येथे तातडीने रक्तदान करण्याची विनंती पालकांनी केली आहे. तसेच अमृताच्या घरची परिस्थिती अत्यंत हलाखीची असून वडील अपंग आहे. त्यामुळे तिच्यावरील शस्त्रक्रिया, तसेच रुग्णालयाचा खर्च पखाले कुटुंबियांकडून करणे शक्य नसल्याने दान दात्यांकडून शक्य तितकी आर्थिक मदत करण्याचे आवाहन छगन पखाले तसेच त्यांच्या कुटुंबियांकडून करण्यात आले आहे.

      अधिक माहितीसाठी संपर्क –
मो. न. – ७२६२८२५८१८, ८०१००२४५२२
 छगन पखाले ( वडील )

मुख्य संपादक : सुरज वानखडे

Featured

Advertisement

Advertisement

error: Content is protected !!