अपघात

शिवशाही बस अपघात प्रकरण, चालकाबाबत धक्कादायक माहिती समोर ; चालकाला अटक

गोंदियात शिवशाही बस अपघातात ११ प्रवाशांचा मृत्यू झाला. सडक अर्जुनी तालुक्यातील खजरी ते डव्वा दरम्यान हा अपघात झाला होता. भरधाव वेगात चालकाचं बसवरील नियंत्रण सुटून हा अपघात झाल्याचं सांगितलं जात आहे.

जनसूर्या मीडिया

दरम्यान, आता या बसच्या चालकाबाबत धक्कादायक अशी माहिती समोर येत आहे. बसचालक प्रणय रायपूरकर याला पोलिसांनी अटक केली असून त्याला २ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आलीय.
शिवशाही बसचा चालक प्रणय उल्हासराव रायपूरकर हा २०११ मध्ये भंडारा आगारात वाहनचालक म्हणून रुजू झाला होता.त्याचा बॅच नंबर ३१८ असून गेल्या १२ वर्षात प्रणय रायपूरकर याच्याकडून ७ वेळा अपघात झाला आहे. डिसेंबर २०१२ ते २९ नोव्हेंबर २०२४ या काळात प्रणय रायपूरकर याच्या हातून एसटीचे सात अपघात झाले.
प्रणय रायपूरकरकडून २० डिसेंबर २०१२ रोजी पहिला अपघात झाला होता. तो अपघात गंभीर होता पण चौकशीनंतर त्याची निर्दोष सुटका केली गेली. शिवशाहीच्या अपघाताआधी झालेल्या ६ घटनांमध्ये सुदैवाने कुणाचा मृत्यू झाला नव्हता. पण यात दोषी आढळल्यानंतरही त्याच्यावर कोणती कठोर कारवाई केली गेली नव्हती.
शिवशाही बसच्या अपघात प्रकरणी प्रणय रायपूरकर याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याला अपघाताच्या दुसऱ्या दिवशी अटक करण्यात आली. न्यायालयात हजर करण्यात आल्यानंतर २ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
प्रणय रायपूरकर याने भरधाव वेगात शिवशाही चालवल्यानं हा अपघात झाल्याचं प्राथमिक तपासात समोर आलंय. यावेळी त्यानं मद्यप्राशन केलं होतं का याचा तपास करण्यासाठी त्याच्या रक्ताचे नमुने घेण्यात आले आहेत. दरम्यान, त्यानं मद्यप्राशन केलं नव्हतं अशी माहिती पोलिसांनी दिलीय.

मुख्य संपादक : सुरज वानखडे

Advertisement

Advertisement

error: Content is protected !!