आपण गाडीत पेट्रोल किंवा डिझेल भरण्यासाठी नियमित पेट्रोल पंपावर जात असतो. पंपावर अनेक सुविधांविषयी फलक पाहायला मिळतात. यापैकी काही सुविधा या फ्री अर्थात विनाशुल्क असतात. पेट्रोल पंपावर कोणत्या सुविधा फ्री असतात, ते सविस्तर जाणून घेऊया…
गाडीत पेट्रोल किंवा डिझेल भरण्यासाठी आपण पंपावर जातो. काही लोक तर रोज इंधन भरण्यासाठी पंपावर जातात. पण पंपावर काही वस्तू, सुविधा फ्री मिळतात. गाडीत पेट्रोल किंवा डिझेल भरल्यावर तुम्हाला बिल मिळते. बिलासाठी तुम्हाला कोणीही नकार देऊ शकत नाही. काही गडबड झाली तर ती बिलामुळे सुधारता येते. पंपावर इंधनाचं बिल हे फ्री मिळतं. त्यासाठी कोणताही चार्ज आकारला जात नाही.
पेट्रोल पंपावर पंपाचा मालक, कंपनीचं नाव आणि संपर्क क्रमांक ठळकपणे लिहिणे अनिवार्य असते. गरजेवेळी लोकांना संबंधित व्यक्तीला संपर्क करता यावा, यासाठी ही माहिती देणं गरजेचं असतं. ही माहिती मिळवण्यासाठी शुल्क आकारलं जात नाही.
जर वाहनात इंधन भरतेवेळी वाहनाला आग लागली तर तुम्ही पंपावरील अग्निशमन साहित्याचा वापर करू शकता. या साहित्यासाठी तुम्हाला कोणतंही शुल्क द्यावं लागत नाही. प्रत्येक पेट्रोल पंपावर प्रथमोपचार पेटीची सुविधा असते. गरजेवेळी तुम्ही या सुविधेचा वापर करू शकता. यात आवश्यक औषधे तसेच बँडेज पट्टी असते. पण याचा वापर करण्यापूर्वी त्याची एक्सपायरी डेट संपली नाही ना हे तपासणं गरजेचं असतं.
आपत्कालीन स्थितीत तुम्ही पेट्रोल पंपावरून फ्री कॉल करू शकता. पंपाच्या मालकाने ही सुविधा उपलब्ध करून देणं आवश्यक असतं. यासाठी तुम्हाला कोणताही खर्च करावा लागत नाही.
सामान्य लोकांसाठी पेट्रोल पंपावर वॉशरूमची सुविधा ही फ्री उपलब्ध असते. या वॉशरूमचा वापर कोणीही आणि कधीही करू शकतो. यासाठी पैसे द्यावे लागत नाहीत. जर या सुविधेसाठी तुम्हाला कोणी मनाई केली तर तुम्ही त्या व्यक्तीची शिफ्ट मॅनेजरकडे तक्रार करू शकता.
पेट्रोल पंपावर पिण्याचे पाणी नि: शुल्क उपलब्ध असते. यासाठी पंपावर आरओ किंवा वॉटर कूलर बसवलेला असतो. हे पाणी तुम्ही विनाशुल्क पिऊ शकता. कार असो अथवा बाईक, पेट्रोल पंपावर तुम्ही तुमच्या गाडीत विनाशुल्क हवा भरू शकता. यासाठी पेट्रोल पंपावर हवा भरण्याचे इलेक्ट्रॉनिक मशीन बसवलेले असते. त्यासाठी एक कर्मचारी नियुक्त केलेला असतो. पण जर तुम्हाला नायट्रोजन हवा भरायची असेल तर तुम्हाला त्याकरिता पैसे द्यावे लागतील. पण काही पंपांवर ही सुविधा देखील फ्री असते.
Post Views: 19
Add Comment