धामणगाव रेल्वे

शाळेचे गेट न लावता १५ वित्त आयोगातील निधी परस्पर लंपास

ग्रामपंचायत भातकुली ( रेणुकापूर ) येथील भ्रष्टाचार माजी सरपंचाने केला उघड

धामणगाव रेल्वे —

             तालुक्यात भातकुली रेणुकापूर ग्रामपंचायत मध्ये १५ वित्त आयोगातुन जिल्हा परिषद शाळा करिता गेट न लावता ३५७०० चे बिल काढून भ्रष्टाचार केल्याचा प्रकार माजी सरपंच मंगेश शंभरकर यांनी बाहेर काढलेला असून त्या संदर्भात पंचायत समिती, जिल्हा परिषद व आमदार याना तक्रार केली आहे.
माजी सरपंच यांनी तक्रारीमध्ये ग्रा. प. प्रशासनातर्फे ३५७०० रुपयांची उचल केल्याचे नमूद असून शाळेच्या लोखंडी गेटचे जीर्ण अवस्थेत तीन फोटोचे लोकेशन सुद्धा सोनेगाव खर्डा येथील असल्याचे म्हटले आहे. त्या संदर्भात भातकुली जिल्हा परिषद शाळेचे शिक्षकाकडून शाळेचे गेट दहा वर्षापासून चांगल्या अवस्थेत आहे त्यामुळे ते बदलवण्याचा प्रश्न निर्माण होत नाही असे सांगण्यात आले. खोटे लोकेशन व गेटचे फोटो जोडून ठेकेदारांनी बिल जोडून ग्रा. प. सचिव, ठेकेदार यांनी स्वतःच्या फायद्यासाठी गेटचे फोटो लोकेशन न लावता परस्पर बिल काढल्याचे तक्रारीमध्ये म्हटले आहे.
१५ वित्त आयोगामधून येणाऱ्या साहित्य वाटप, फिल्टर वाटप व चिलर त्यांचे सुद्धा दोन महिने अगोदर बिल काढल्याचा आरोप तक्रारी मध्ये केलेला आहे. सरपंच व ठेकेदार यांच्यावर भ्रष्टाचार केल्याबद्दल फौजदारी गुन्हा दाखल करावे, ठेकेदाराचे लायसन रद्द करावे, सरपंच यांनी पदाचा दुरुपयोग केल्यामुळे योग्य ते चौकशी करून सरपंच अपात्र करण्याची कार्यवाही करावी. वित्त आयोगाची चौकशी करावी करून फौजदारी गुन्हे दाखल करावे अशी मागणी तक्रारीमध्ये माजी सरपंच शंभरकर यांनी केलेली आहे.

मुख्य संपादक : सुरज वानखडे

Featured

Advertisement

Advertisement

error: Content is protected !!