धामणगाव रेल्वे

१५ दिवसांपासून धर्मादाय आयुक्त कार्यालयाची वेब् साईट बंद

वेळेत काम होत नसल्याने वकील आणि पक्षकारांमध्ये मनस्ताप

धामणगाव रेल्वे –

गेल्या १५ दिवसांपासून धर्मादाय आयुक्त कार्यालयाची वेबसाईट बंद असल्याकारणाने आवश्यक असलेली कामे वेळेत होत नाही त्यामुळे वकील आणि पक्षकारांमध्ये मनस्ताप वाढत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. एकीकडे धर्मादाय आयुक्तांच्या कार्यालयात ई फायलिंग अनिवार्य झाल्यानंतर तिथे दाखल होणारी प्रकरणे पाठपुरावा घेण्यासाठी साठी गेले असता ऑफिसची साईट बंद असल्याचे कर्मचाऱ्यांकडून सांगण्यात येते. त्यामुळे गेल्या १५ दिवसापासून अनेक कामे तसेच रखळली आहे. अनेक दिवसापासून कामे वेळेत होत नसल्यामुळे पक्षकार आणि वकिलांमध्ये दुरावा निर्माण होत असल्याचे सुद्धा बोलल्या जात आहे.
प्रकरणाचा लवकर निपटारा व्हावा यासाठी ऑनलाईन पद्धतीवर जोर देऊन कामे त्वरित व्हावी यासाठी प्रयत्न सुरु असताना इतके दिवस होऊन सुद्धा वेबसाईट बंद असल्याने ऑनलाईन पेक्षा ऑफलाईन पद्धतच योग्य असल्याची चर्चा वकीलसंघ आणि पक्षकारांमध्ये सुरु आहे. तरी सुद्धा पढेंगा भारत तो बढेंगा भारत ह्या तत्वावर जोर देऊन उत्कृष्ट अध्यवत कर्मचारी भरती करून वेबसाईट बंद राहणार नाही याची दखल् घेण्याची मागणी जोर धरू लागली आहे.

मुख्य संपादक : सुरज वानखडे

Featured

Advertisement

Advertisement

error: Content is protected !!