प्रहार उमेदवार च्या एकाला चलो च्या भूमिकेने मित्रपक्ष शेतकरी संघटनेचे पदाधिकारी सह कार्यकर्ते नाराज
धामणगाव रेल्वे – प्रतिनिधी
धामणगाव विधानसभा क्षेत्रात मागिल ५ – ६ वर्षांपासून शेतकरी संघटनेच्या माध्यमातून शेतकरी मुद्यावर आक्रमक भूमिका घेऊन विविध आंदोलनाच्या माध्यमातून आपली तसेच संघटनेची एक आगळी – वेगळी ओळख एड. चेतन परडखे ह्यांनी निर्माण केली. दी. १५ /९ /२४ रोजी चांदुर रेल्वे येथे शेतकरी हक्क परिषदेमध्ये एड. वामनराव चटप ह्यांनी त्यांच्या उमेदवारीची घोषणा केली होती. परंतु त्यानंतर १९ / ९ / २०२४ रोजी प्रहार ने शेतकरी संघटने सोबत संबंधबांधून जागांची विभागणी केली वा एनवेळी धामणगाव विधानसभेची जागा प्रहारचे प्रवीण हेंडवे याना देण्यात आली…
वास्तविक पाहता तिसरी आघाडी निर्माण असताना इतर सहकारी पक्षातील पदाधिकारी यांच्याशी समन्वय साधून पुढील वाटचाल करणे उमेदवाराकडून अपेक्षित होते. परंतु प्रवीण हेंडवे याना प्रहार पक्षाकडून उमेदवारी मिळाल्यानंतर त्यांनी शेतकरी संघटनेच्या एकही कार्यकर्त्याला साधी विचारपूस सुद्धा न केल्याने जवळपास ३५०० – ४००० कार्यकर्ते वा त्यांच्या सोबत असलेले मतदार ह्यांनी काल बैठक लावून त्यांची भूमिका राखीव ठेवलेली आहे. अशातच धामणगाव विधानसभे मध्ये चुरशीच्या लढतीत शेतकरी संघटनेची भूमिका निर्णायक ठरण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे धामणगाव मतदारसंघात शेतकरी संघटना काय भूमिका घेते याकडे संपूर्ण विधानसभेत अनेक तर्क – वितर्क लावण्यात येत आहे.
ज्याप्रमाणे शेतकरी संघटनेने मतदारसंघात शेतकरी मुद्यावर वेगवेगळे आंदोलणे करून आपली जागा विधानसभेसाठी मजबूत केली होती. परंतु तिसरी आघाडी निर्माण होऊन जागा प्रहार पक्षाचे उमेदवार याना सुटली तरीही आम्ही नाराज नव्हतो. परंतु प्रहारच्या उमेदवाराने एकला चलो ची भूमिका घेतल्याने संघटनेचे सर्वच कार्यकर्ते नाराज असल्याने आम्ही आमची स्वातंत्र्य भूमिका घेण्यास आज मोकळे आहोत – एड. चेतन परडखे, शेतकरी संघटना, धामणगाव प्रमुख
Post Views: 28
Add Comment