हटके

सरपंच साहेब गर्लफ्रेंडसोबत ‘लाँग ड्राईव्ह’वर ; बायकोनं थेट चौकात पकडलं अन् धु धु धुतलं !

घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल

जनसूर्या मीडिया

मध्य प्रदेशातील उज्जैनमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. सरपंच आपल्या मैत्रिणीसोबत हॉटेलमध्ये दर्जेदार वेळ घालवण्यासाठी घरापासून सुमारे २१० किलोमीटरचा प्रवास केला. मात्र, त्याची पत्नी अनेक दिवसांपासून त्याच्यावर बारीक नजर ठेवून होती याची त्याला कल्पना नव्हती. बायको गाडीसमोर उभी असलेली पाहून धक्काच बसला
सरपंच मैत्रिणीसोबत हॉटेलमधून बाहेर पडून कारमध्ये बसला असता, गाडीसमोर पत्नी उभी असल्याचे पाहून त्याला धक्काच बसला. मीडिया रिपोर्ट्सनुसार, पती मोबाईलवर एका अनोळखी महिलेशी बोलत असल्याचे ऐकून पत्नीला संशय आला. तो महिलेसोबत उज्जैन येथील एका हॉटेलमध्ये राहत असल्याचे समजताच ती तत्काळ कारने नीमचमध्ये गेली.

सरपंचाची बायको वाट पाहत राहिली, बाहेर येताच चोप दिला

मिळालेल्या माहितीनुसार, ती हॉटेलबाहेर तिचा पती बाहेर येण्याची वाट पाहू लागली. सरपंच आपल्या मैत्रिणीसोबत बाहेर येताच त्याच्या पत्नीसह कुटुंबातील इतर सदस्यांनी त्याला गाठले. सरपंच आणि त्यांची मैत्रीण हॉटेलमधून बाहेर पडल्यावर पत्नीने त्यांची गाडी थांबवलं आणि दोघांना रंगेहाथ पकडले. त्यानंतर प्रेयसी आणि पत्नीमध्ये भांडण सुरू झाले. प्रेयसीने सरपंचाच्या पत्नीला ती कोण आहे, असे विचारले असता, ती कोण आहे ते पोलिस ठाण्यात सांगेन, असे उत्तर पत्नीने दिले.
यानंतर सरपंचाच्या बायकोने गाडीमध्ये मैत्रीणीला चोप देण्यास देण्यास सुरुवात केली. गाडीमध्ये बायको चोप देत असताना बायकोला थांबवण्याचे धाडस सरपंचला झालं नाही. मैत्रीण त्याच्याकडे पाहत होती, पण तो हतबल झालेला दिसून आला. यानंतर मैत्रीणीला कारमधून बाहेर काढून पुन्हा झिंज्या धरून चोप देण्यात आला.
रस्त्यात दोन महिलांमधील भांडण पाहून हॉटेलबाहेर गर्दी जमली. दरम्यान, सरपंच हाताने तोंड झाकून शांतपणे गाडीच्या आत बसला. कुटुंबातील इतर सदस्यांनी व्हिडिओ रेकॉर्ड केला जो सोशल मीडियावर व्हायरल झाला. सरपंच जितेंद्रचे लग्न सुमारे २० वर्षांपूर्वी झाले होते. हे लग्न फार काळ टिकले नाही. यानंतर दुसरे लग्न केले. तो चार मुलांचा बाप आहे. त्याला तिसऱ्यांदा लग्न करायचे आहे, असा आरोप त्याच्या दुसऱ्या पत्नीने केला आहे. ती अंगणवाडी सेविका असल्याचे सांगण्यात येत आहे. यामुळे तो आपल्यासोबत गैरवर्तन करत असल्याचा आरोप सरपंचच्या पत्नीनं केला आहे.
या घटनेबाबत पोलीस स्टेशन प्रभारी नरेंद्र यादव यांनी सांगितले की, याप्रकरणी अद्याप कोणतीही औपचारिक तक्रार दाखल करण्यात आलेली नाही. पत्नीने तक्रार दिल्यास त्यानुसार कारवाई केली जाईल.

मुख्य संपादक : सुरज वानखडे

Featured

Advertisement

Advertisement

error: Content is protected !!