नांदगाव खंडेश्वर : प्रतिनिधी
वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार डॉ. निलेश विश्वकर्मा यांना निवडून आणण्यासाठी विविध संघटनेच्या कार्यकर्त्यांनी वंचित बहुजन आघाडीत जाहीर प्रवेश केलेला आहे. प्रवेशावेळी डॉ. निलेश विश्वकर्मा यांनी कार्यकर्त्यांना पुष्पगुच्छ व पक्षाचा दुपट्टा देऊन त्यांचा सन्मान केला.
धामणगाव मतदार संघातील तेली माळी धनगर व इतर समाजातील संघटनेच्या नेत्यांनी नांदगाव खंडेश्वर येथे प्रकाश आंबेडकर यांच्या उपस्थितीत जाहीर प्रवेश केला. ओबीसी व आदिवासी पदाधिकाऱ्यांच्या प्रवेशामुळे डॉ. निलेश विश्वकर्मा यांचे पारडे अधिक जड झालेले आहे. ही निवडणूक संघर्षाची असून दोन मातंगरांच्या विरुद्ध आहे. गेल्या साठ वर्षापासून मतदार संघात कुठलाही विकास झालेला नाही त्यामुळे आलटून पालटून सत्ता भोगणाऱ्यांना यावेळी जनता हिसका दाखविल्याशिवाय राहणार नाही. शेतकऱ्यांसमोर अनेक प्रश्न निर्माण झालेले आहे. परंतु दोन्ही आजी माजी आमदारांनी यावर कुठल्याही प्रकारचा तोडगा काढलेला नाही. त्यामुळे जनता दोघांनाही वैतागली आहे. काँग्रेसवाले मुस्लिम मते वळविण्याचा प्रयत्न करीत आहेत. परंतु बाळासाहेबांनी जाहीर सभेत एन आर सी चा एन आर सीचा मुद्दा पटवून सांगितला. त्यामुळे वंचित बहुजन आघाडी शिवाय दुसरा पर्याय नाही, असेही त्यांनी यावेळी सांगितले. डॉक्टर निलेश विश्वकर्मा यांना मिळत असलेला प्रतिसाद पाहता विरोधकांचे चांगले धाबे दणाणले आहे. मात्र यावेळी नागरिकांनी सिलेंडरला निवडून आणण्याचा एक प्रकारे निर्धार केला आहे, त्यामुळे दोन्ही आजी-माजींना जनता धडा शिकवणार आहे.
वंचित बहुजन आघाडी मध्ये विविध समाजाच्या पदाधिकाऱ्यांनी जाहीर प्रवेश केला आहे. यामध्ये विजय देशमुख धामणगाव रेल्वे, सचिन विलायतकर, वाठोडा, सुनील पाटणकर, धामणगाव रेल्वे, नितीन गर्भारकर, धामणगाव रेल्वे, अखिल शेख, इनायत शेख, संतोष बिहारे यांचा समावेश आहे. या विविध संघटनेच्या पाठिंबामुळे डॉ. निलेश विश्वकर्मा यांचे पारडे जड झालेले आहे.
Post Views: 23
Add Comment