आनंदाच्या वातावरणात गवळी कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर
जनसूर्या मीडिया
मळणीयंत्रात मका काढत असताना अचानक मशीनमध्ये डोक्याचे केस अडकून एका मजुरी करणाऱ्या महिलेचे शिर धडावेगळे झाल्याने तिचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. कोकिळाबाई संजय गवळी असे या मृत महिलेचे नाव आहे. सिल्लोड तालुक्यातील वसई येथे ही घटना घडली आहे.या घटनेने कुटुंबियांवर आणि गावावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.
वसई येथे गुरुवारी दुपारी गावातील फकीरराव सनान्से यांच्या शेतात मका काढणीचे काम सुरू होते. यासाठी कोकिळाबाई गवळीसह इतर मजुर महिला तेथे काम करीत होत्या. मका मशीनमध्ये टाकताना अचानकपणे कोकिळाबाई यांचे केस मशीमध्ये जाऊन अडकले. यामुळे वेगाने त्या मशीनमध्ये ओढल्या गेल्या आणि मोठा अनर्थ घडला. केस मशीनमध्ये अडकल्याने त्या वेगाने मशीनकडे ओढल्या गेल्या आणि त्यांच शीर धडावेगळ झालं. त्यामुळे त्यांचा मृत्यू झाला आहे. या घटनेने मजुर महिलांना मोठा झटका बसला आहे.तसेच महिलांमध्ये दहशतीचे वातावरण पसरले आहे.
कोकिलाबाई या अत्यंत गरीब होत्या. कोकिळाबाई आणि संजय गवळी या दाम्पत्याकडे केवळ दीड एकर शेती आहे. शेतीत भागत नसल्याने दोघेही पती-पत्नी रोज मजुरीची कामे करतात. त्यांना दोन मुली आणि एक मुलगा आहे. दोन्ही मुलींचे विवाह झालेले असून, त्यांचा मुलगा नुकताच होमगार्डमध्ये भरती झाला आहे. त्यामध्ये परिवारात आनंदाचे वातावरण होते मात्र नियतीने वेगळाच घाव घातलाय. त्यामुळे कोकिळाबेन यांच्या मृत्यूने कुटुंबियांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.तसेच गावात हळहळ व्यक्त होतं आहे.
Post Views: 26
Add Comment