धामणगाव रेल्वे राजकीय

मंगरुळ दस्तगीर व पेठ रघुनाथपुर या जुळ्या गावात “प्रहार” चा झंझावात,

प्रहार चे उमेदवार प्रविण हेंडवे यांची प्रचारात मुसंडी

धामणगाव रेल्वे –

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर सर्वच पक्षा चा प्रचार मोठ्या जोरासोरात सुरू असून अश्यातच धामणगाव रेल्वे विधानसभा मतदारसंघातून बच्चु कडू यांच्या ‘प्रहार’ वर उभे असलेले प्रविण हेंडवे यांनी सुद्धा प्रचाराचा धडाका लावलेला आहे. धामणगाव तालुक्यातील सर्वात मोठे असलेले मंगरूळ दस्तगीर या जिल्हा परिषद सर्कल मध्ये त्यांनी प्रचारात उसंडी घेतल्याचे दिसून येत आहेत. मंगरूळ दस्तगीर व पेठ रघुनाथपुर येथील प्रचार रॅली मध्ये मोठ्या प्रमाणात दिसून आलेला जनसमुदाय व तरूणांचा त्यांना मिळत असलेला प्रतिसाद पाहता प्रहार चा प्रचाराचा झंझावात मंगरूळ दस्तगीर व पेठ रघुनाथपुर या जुळ्या गावात दिसून येत आहे.

           मंगरूळ दस्तगीर हा तसा प्रहार चा गड मानला जातो. मागील जिल्हा परिषद निवडणुकीत येथून प्रहारचे उमेदवार प्रफुल्ल डाफ यांनी कॉंग्रेस उमेदवार सुरेश निमकर यांना काट्याची टक्कर देत द्वितीय क्रमांकाची मते यांच मंगरूळ दस्तगीर गावा मधुन त्यांनी घेतली होती. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत प्रविण हेंडवे किती मते घेतील व त्यांची ‘बॅट’ कशी चालेल हे पाहणे औचित्याच ठरेल. तूर्तास प्रहार ने निवडणूक प्रचारात उसंडी घेतल्याचे दिसून येत आहे.

मुख्य संपादक : सुरज वानखडे

Featured

Advertisement

Advertisement

error: Content is protected !!