लहान भावाला विधी मंडळात पाठवा राज्यात पुढील पाच वर्षात धामणगाव मतदार संघ विकासाचे मॉडेल ठरेल – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
धामणगाव रेल्वे
पंधरा वर्षाच्या तुलनेत अडीच वर्षात आ.प्रतापदादा अडसड यांनी २ हजार ३०० कोटीची विकास कामे केली माझा लहान भाऊ प्रताप ला आपण विधिमंडळात पाठवा
राज्यात विकासाचा मॉडेल हे धामणगाव विधानसभा मतदारसंघ ठरेल असा विश्वास राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.
१० नोव्हे रोजी येथील मिश्री कोटकर मैदानात भाजपा महायुतीचे उमेदवार प्रताप अडसड यांच्या प्रचार सभेसाठी धामणगावात आले होते. ते बोलताना म्हणाले की यापूर्वी पंधरा वर्षात या मतदारसंघात केवळ जातीपाती चे राजकारण माजी आमदाराने केले पंधरा वर्ष एमआरजीएस चे अध्यक्ष असताना पादन रस्ते सुद्धा झाले नाही ९४४ किमी चे रस्ते आ प्रताप अडसड यांनी आणले तर माजी आमदाराने याविषयी तक्रारी केल्या स्वतःच्या ताब्यात असलेल्या बाजार समिती व खरेदी विक्री संघात सोयाबीनची खरेदी सुरू न करता शेतकऱ्यांना वेठीस धरले आता माजी आमदारराला शेतकऱ्याचा पुळका आला. समृद्धी मार्गासाठी प्रथम विरोध केला त्यानंतर स्वतःच्या शेत जमिन प्रकल्पाला देऊन कोट्यावधी रुपये मिळून घेतले विकासासाठी पंधरा वर्ष व आताची अडीच वर्षे याची तुलना आपणच करावी माझ्या लहान भावाला प्रताप अडसड यांना विधिमंडळात पाठवा हा मतदारसंघ राज्यात पहिल्या क्रमांकाचे विकासाचे मॉडेल ओळखला जाईल असा विश्वास फडणवीस यांनी व्यक्त केला.
मागच्या काळात कापूस, सोयाबीनचे भाव कोसळल्याने शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी भावांतर योजना आणली. हेक्टरी पाच हजार रुपयांची मदत शेतकऱ्यांना दिली, आम्ही एवढ्यावरच थांबलेलो नाही.येत्या काळात हमीभावापेक्षा कमी दर शेतकऱ्यांना मिळाल्यास यातील फरकाची रक्कम थेट शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करणार, असे वचन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकरी हितासाठी कटिबद्ध असल्याचे वचन दिले आहे. शेतकऱ्यांना आधार देण्यासाठी संपूर्ण कर्जमाफीचा करणार असल्याचेही त्यांनी नमूद केले. यावेळी व्यासपीठावर आमदार प्रताप अडसड, माजी खासदार नवनीत राणा, सुरेश वाघमारे, जनार्धन रोठे, संतोष महात्मे, हरीशचंद्र खंडाळकर, बबनराव गावंडे, निकेत ठाकरे, रवींद्र मुंदे, घनशाम सारडा, बंडू भुते, मनोज डहाके, मोहन गावंडे, उषा तिनखेडे, नलिनी मेश्राम, रामदास निस्ताने, प्रशांत मून, पुरुषोत्तम बनसोड दुर्गाबक्षसिंग ठाकूर , विलास बुटले, अर्चना तिखले, सुरेखाताई शिंदे, राकेश पाठक, रणजीत पाटेकर, मनोज चव्हाण, रुपाली नाकाडे, मोनाली बाबुळकर, सविता ठाकरे, कय्युम भाई, जावेद भाई, योगश अंभोरे, गिरीश भूतडा, पवन पडोळे, निवृत्ती लोखंडे, प्रफुल मानके, योगेश झिमटे, रोशन खेरडे, अंकित कदम, अखीलेश पोळ, किरण निस्ताने, नंदा माने, श्रीराम पत्रे व आदी उपस्थित होते.
देवेंद्र फडणवीस म्हणाले, शेतकऱ्यांसाठी मोफत विजेचा निर्णय घेतला. सरकारकडून शेतकऱ्यांना कृषीपंपासाठी ही वीज पुरविली जाईल. रात्री शेतावर पाणी देण्यासाठी जाण्याचीही गरज पडणार नाही. दिवसा शेतात काम करीत असतानाच सिंचन करणे शक्य होईल. कारण दिवसा १२ तास वीज शेतकऱ्यांना मिळणार आहे. हे प्रत्यक्षात आणण्यासाठी वेगळी कंपनीच उभारली आहे.
लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून महिलांना ओवाळणी म्हणून दर महिन्याला १५०० रुपये देतो. आम्ही पैसे देऊ असे सांगताच महाविकास आघाडीच्या नेत्यांनी वेड्यात काढले, अनेक वल्गना केल्या. हायकोर्टात गेले. कोर्टाने योजना बंद करण्यास नकार दिला. यानंतर आम्ही त्यांच्या नाकावर टिच्चून नोव्हेंबर महिन्यापर्यंतचे पैसे खात्यावर दिले आहेत. तुमचा आशीर्वाद मिळाला की २१०० रुपये आम्ही लाडक्या बहिणींना देणार आहोत. महाविकास आघाडी वाल्यांचे हे षडयंत्र थांबविण्यासाठी त्यांच्या डोक्याचे नटच कसतो. मग लाडक्या बहिणींविषयी असले विरोधी विचार त्यांच्या डोक्यात येणार नाही, असा घणाघात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला.
संचालन. रामदास निस्ताने यांनी केले तर आभार मनोज डहाके .यांनी मानले
Post Views: 34
Add Comment