राजकीय

जनसामान्यांचे जनसेवक, हक्काचा माणूस, खरा लोकनेता

धामणगाव प्रतिनिधी

धामणगाव मतदार संघातील काँग्रेस महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार प्रा. वीरेंद्रभाऊ जगताप यांच्या विधानसभा निवडणूक २०२४ च्या निमित्ताने संकल्प विजय यात्रा तथा सभेचे आयोजन करण्यात आले. सावंगी (मग्रापूर), पाथरगाव, थूगाव, कारला, आमला, जळका जगताप, सालोरा, या गावाला भेट देऊन ग्रामस्थांशी विविध विषयावर चर्चा करून सुसंवाद साधला.

यावेळी जनतेने गावातील विविध समस्या अडचणी यावर चर्चा केली. मतदान हा आमचा अधिकार आहे त्यातूनच आम्ही आमचा जनसामान्याचा जनसेवक, लोकनेता निवडून देऊ असा विश्वास त्यांनी प्रा. वीरेंद्रभाऊ जगताप यांच्या नेतृत्वावर दाखविला.

 मातीशी नाळ जोडलेला नेता याची प्रचिती आली. प्रा. वीरेंद्र भाऊ जगताप यांनी लोकांना मतदारसंघाच्या विकासास मी नेहमीच तत्पर वचनबद्ध राहील असे आश्वासन दिले. जनतेकडून या संकल्प विजयात्रेला मोठ्या संख्येने उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

मुख्य संपादक : सुरज वानखडे

About the author

मुख्य संपादक : सुरज वानखडे

Add Comment

Click here to post a comment

Featured

Advertisement

Advertisement

error: Content is protected !!