धामणगाव रेल्वे

धामणगावातून ५ लाख तर चांदुर रेल्वे मधील व्यक्तीकडून ४ लाख ३८ हजार जप्त

स्थानिक गुन्हे शाखा पोलिसांची कारवाई

धामणगाव रेल्वे –

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर स्थानिक गुन्हे शाखेचे पथक नियमित गस्तीवर असतांना मिळालेल्या बातमी वरून धामणगावातील एका व्यक्तीस ताब्यात घेतले असता त्याच्याकडून ५ लाख रोख रक्कम मिळाली सदरचा व्यक्ती धामणगाव येथील रहिवासी आहे. तर दुसरीकडे चांदुर रेल्वे येथील सुद्धा एका व्यक्तीकडून ४ लाख ३८ हजार मिळून आली, हा व्यक्ती मसाणगंज, अमरावती येथील रहिवासी आहे. सदरच्या दोन्ही रकमेबाबत ताब्यात घेण्यात आलेल्या व्यक्तींना विचारणा केली असता समाधानकारक उत्तर न मिळाल्याने दोन्ही रक्कम ताब्यात घेण्यात आली. मिळालेल्या दोन्ही व्यक्तींकडे रोख रक्कमे संबंधात असणारे पुरावे तपासून पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.
सदरची कार्यवाही ८ नोव्हे २४ रोजी विशाल आनंद, पोलीस अधीक्षक, अमरावती ग्रामीण, पंकज कुमावत, अपर पोलीस अधिक्षक अमरावती ग्रामीण यांच्या मार्गदर्शनात पो. नी. किरण वानखडे, स्था. गु. शा. यांच्या नेतृत्वात पो.उप. नी. मो. तसलीम यांच्या पथकाने केली आहे.

मुख्य संपादक : सुरज वानखडे

Featured

Advertisement

Advertisement

error: Content is protected !!