यवतमाळ

फटाक्याच्या वादात तरुणाची निर्घृण हत्त्या ; घटना सीसीटीव्हीत कैद

यवतमाळ : प्रतिनिधी

 सर्वत्र दिवाळी उत्सव साजरा केला जात आहे. या सोबतच फटाक्यांची आतिषबाजी केली जात आहे. मात्र फटाके फोडण्यावरून झालेला वाद तरुणाच्या जीवावर बेतलं आहे. या वादात तरुणाच्या पोटात शस्त्राने वर करून हत्या केल्याची घटना यवतमाळच्या पुसदमध्ये घडली आहे.
सदरची घटना यवतमाळच्या पुसदमधील वसंतनगर येथे घडली आहे. सगळीकडे दिवाळीचा उत्सव साजरा होत आहे. फटाक्यांची आतिषबाजी करत उत्सव साजरा करण्यात येत आहे. याच दरम्यान यवतमाळच्या पुसदमध्ये फटाके फोडण्याच्या कारणावरून दोन तरुणात वाद उद्भवला. हा वाद इतका विकोपाला गेला की यात एकाला जीव गमावण्याची वेळ आली. यात काही कळण्याच्या आत तरुणाच्या पोटात चाकूने वार करत त्याला जीवे मारले.
संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद
फटाके फोडण्यावरून तरुणांमध्ये वाद निर्माण झाला. या वादात झाल्याने विशाल लोखंडे (वय २३) या तरुणाची धारदार शस्त्राने भोसकून हत्या करण्यात आली. आदित्य आठवले (वय २१) असे संशयित रोपीचे नाव असून सदर घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. दरम्यान आदित्य आठवले याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहे. आदित्य आठवले हा पूसद शहरातील संभाजीनगर येथील आहे.

मुख्य संपादक : सुरज वानखडे

Advertisement

Advertisement

error: Content is protected !!