राजकीय

दिल्लीवारी करूनही अमरावतीच्या दोन आमदारांना पुन्हा तिकीट नाही ?

अमरावतीमध्ये राजकीय खळबळ

अमरावती प्रतिनिधी ;

             जिल्ह्यातील दोन विद्यमान आमदारांची फरफट होताना दिसत आहे. विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी मुंबई -दिल्ली वारी करून दोन्ही आमदार थकले आहेत. मेळघाटचे आमदार राजकुमार पटेल यांना महायुतीने उमेदवारी नाकारली आहे. तर वरुड मोर्शीचे आमदार देवेंद्र भुयार यांनाही महायुतीने उमेदवारी नाकारली आहे.

त्यामुळे आमदार देवेंद्र भुयार आणि आमदार राजकुमार पटेल यांना अपक्ष उभं राहण्याची वेळ आली आहे. दोन आठवड्यांपूर्वीच राजकुमार पटेल यांनी प्रहार सोडलं होतं आणि शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला होता. त्यांना सेनेची उमेदवारी मिळेल सांगितले होतं मात्र अद्याप त्यांना उमेदवारी मिळालेली नाही.

त्यामुळे आता राजकुमार पटेल पुन्हा बच्चू कडू यांच्या प्रहारकडून निवडणूक रिंगणात उतरणार अशी चर्चा आगे. तसेच देवेंद्र भुयार यांनाही अद्याप महायुतीने उमेदवारी न दिल्याने देवेंद्र भुयार अपक्ष निवडणूक लढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विश्वासू आमदार म्हणून देवेंद्र भुयार यांची ओळख आहे. मात्र भुयार यांना अजित पवारांनी जोरदार झटका दिल्याचं दिसतंय. महिलांबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्याने आमदार देवेंद्र भुयार यांची उमेदवारी कापल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे.

मुख्य संपादक : सुरज वानखडे

Featured

Advertisement

Advertisement

error: Content is protected !!