राजकीय

मोर्शी मतदारसंघातून सुशील बेले आझाद समाज पार्टीचे अधिकृत उमेदवार

वरूड प्रतिनिधी – निलेश निंबाळकर

४३ वरूड मोर्शी विधानसभा मतदार संघातून आझाद समाज पार्टीची अधिकृत उमेदवारी आक्रोश जनशक्ती संघटनेचे अध्यक्ष सुशीलभाऊ बेले यांना जाहीर करण्यात आली आहे. विधानसभा निवडणूक २०२४ साठी वरूड मोर्शी मतदार संघात मोठ मोठ्या हालचाली होताना दिसत आहेत. राष्ट्रीय पक्षातील स्थानिक नेत्यांमध्ये अंतर्गत कलह सुरू असल्यामुळे अजून पर्यंत उमेदवारांच्या नावांची लिस्ट जाहीर झाली नाही परंतु या मतदार संघातून सामाजिक कार्याचा वसा जोपासणारे जनतेच्या हाकेला धावून जाणारे सर्वात चांगला जनसंपर्क असणारे आक्रोश जनशक्ती संघटनेचे अध्यक्ष सुशील बेले यांची उमेदवारी अपक्ष असल्याचं बोलल्या जात असतानाच आझाद समाज पार्टीचे महाराष्ट्र प्रदेश प्रमुख महासचीव आणि कोषाध्यक्ष मा. मनीषजी साठे यांच्याशी सतत संपर्क सुरू असताना संघटनेच्या कार्यकर्त्यांच्या आणि मार्गदर्शकांच्या प्रयत्नांना यश मिळालं आणि मनीष साठे यांच्या मार्फत आझाद समाज पार्टी (कांशीराम) ची अधिकृत उमेदवारी ए बी फॉर्म देऊन जाहीर करण्यात आली.

मा. खासदार चंद्रशेखर आझाद यांच्या पक्ष्याची अधिकृत उमेदवारी मिळाल्यामुळे सुशील बेले यांची बाजू भक्कम झाल्याची वार्ता सगळीकडे जोर धरत आहे एकंदरीत मतदार संघातील समर्थकांच्या मनात नवा जोश आणि उल्हास पाहायला मिळत असल्याचं चित्र दिसून येत आहे वरूड मोर्शी मतदार संघातील विकासाला नवे स्वरूप देणं हीच माझी जबाबदारी आहे असे मत त्यांनी स्वतः स्पष्ट केले.

मुख्य संपादक : सुरज वानखडे

About the author

मुख्य संपादक : सुरज वानखडे

Add Comment

Click here to post a comment

Featured

Advertisement

Advertisement

error: Content is protected !!