स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते चेतन परडखे यांच्या नेतृत्वात शेतकऱ्यांचे चक्का जाम आंदोलन
धामणगाव रेल्वे –
गेल्या अनेक वर्षांपासून धनापूर शिव पांदण रस्त्याची दुरावस्था बघितलीअसता त्या रस्त्यावर शेती करणे तर दूरच चालणे सुद्धा कठीण होऊन बसले असल्याचे वास्तव समोर येत आहे. तर मागील वर्षीपासून तालुक्यातअनेक ठिकाणची पांदण रस्ते मंजूर झाले असून ते शेतकऱ्यांच्या सोयीसाठी दुरुस्त झाले आहे. मात्र विरूळ रोंघे ते चांदुर कडे जाणाऱ्या धनापूर शिव पांदण रस्त्याची दुरुस्ती आवश्यक असताना तसेच त्याबाबतचा ग्रामपंचायत ठराव असून त्या जागेचे लोकेशन असताना देखील तत्कालीन आणि सध्यस्थित केवळ राजकीय हेतुपुरस्पर रस्त्याची कामाला मंजुरी दिली नसल्याची तक्रार यावेळी गावातील शेतकऱ्यांनी तहसीलदार यांच्याकडे केली होती.
पांधन रस्त्याची दुरावस्था दाखवताना शेतकरी
त्या अनुषंगाने आज ६ सप्टेंबर २४ रोजी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते चेतन परडखे यांच्या नेतृत्वात धनापूर व विरुळ मौज्यातील असंख्य शेतकऱ्यांनी रस्त्यावर उतरून चांदूर रेल्वे ते धामणगाव रोडवर चक्का जाम आंदोलन केले. त्यामुळे बराच वेळ वाहतूक सेवा विस्कळीत झाली होती.
आंदोलना दरम्यान झालेली वाहतूक कोंडी
तर या चक्क जाम आंदोलन दरम्यान नायब तहसीलदार आशिष वीर यांनी आंदोलनाला भेट देऊन पांदण रस्त्याची पाहणी करूनलवकरच या पांदन रस्त्या विषयी तोडगा काढण्यासाठी शेतकऱ्यांना आश्र्वासित केले असून चक्का जाम आंदोलन मागे घेण्यास आवाहन केले.
सदरच्या चक्काजाम आंदोलनाला स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेतेऍड चेतन परडखे, मदन कथलकर, प्रमोद झंजड, शिवदास वानखडे, सुरेश वानखडे, प्रमोद कावळे सह धनापूर व विरूळ रोंघे येथील असंख्य शेतकरी उपस्थित होते..
Post Views: 49
Add Comment