शैक्षणिक

महावाचन उत्सव २०२४ अंतर्गत निघाली ग्रंथ दिंडी

अधिकारी, लेखक, कवींचा दिंडीत सहभाग

धामणगाव रेल्वे – प्रतिनिधी 

येथील पंचायत समितीच्या गट साधन केंद्रातर्फे गुरुवारला महावाचन उत्सव २०२४ अंतर्गत तालुकास्तरीय ग्रंथ प्रदर्शनी व पुस्तक मेळाव्याचे आयोजन जुना धामणगाव येथील जिल्हा परिषद शाळेच्या प्रांगणात करण्यात आले होते. यानिमित्त गावातून ग्रंथ दिंडी काढण्यात आली. या दिंडीत अधिकारी, लेखक कवींचा सहभाग दखलपात्र होता.

पंचायत समितीच्या गट साधन केंद्राचा उपक्रम

वाचन हे व्यक्तिमत्व विकासाचे एक महत्वाचे साधन आहे. वाचनामुळे ज्ञानवृध्दी होते. विचाराची क्षितिजे विस्तारीत होतात. व्यक्तीमध्ये सर्जनशीलता वाढते. विविध साहित्य, कथा, कादंबऱ्या आत्मचरित्र आणि शैक्षणिक पुस्तकांचे वाचन करुन व्यक्ती नवीन माहिती आणि दृष्टीकोण प्राप्त करते. वाचनाच्या सवयीमुळे भाषिक कौशल्ये सुधारताल आणि व्यक्तीमत्व अधिक समृध्द होत असते.

तालुकास्तरीय ग्रंथ प्रदर्शनी व पुस्तक मेळावा

त्या अनुषंगाने सर्व माध्यमाच्या व सर्व व्यवस्थापनाच्या शाळांमध्ये “महावाचन उत्सव २०२४” हा उपक्रम राबविण्यात येत आहे.दरम्यान तालुकास्तरीय ग्रंथ प्रदर्शनी व पुस्तक मेळाव्याचे आयोजन जुना धामणगाव येथील जिल्हा परिषद शाळेच्या प्रांगणात करण्यात आले होते. या मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी पंचायत समितीच्या सभापती बेबी उईके ह्या होत्या. तर प्रमुख अतिथी म्हणून पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी माया वानखडे, गटशिक्षणाधिकारी संदीप बोडखे, डी.सी.गायकवाड, उपसरपंच हर्षा तायडे, गटसमन्वयक धीरज जवळकार, शिक्षण विस्तार अधिकारी साबीर खान, सपना भोगावकर, शालेय पोषण आहार अधीक्षक अरुण चव्हाण, नगर परिषदेचे शिक्षण प्रशासन अधिकारी उमेश गोंडिक,विदर्भ साहित्य संघाचे अध्यक्ष सच्चीदानंद काळे, कवियत्री बेबीनाझ खान व आदी उपस्थित होते. तर केंद्र प्रमुख जगदिशकुमार शिरसाट, डी.एस.राठोड, नरेश पाटील, प्रफुल्ल डाफ, धनंजय राऊत, प्रफुल्ल महल्ले, शकील अहमद, शक्ती राठोड, साधन व्यक्ती शेषराव चव्हाण, कलेश कांबळे, ज्योती राऊत, वैशाली लीलर्व्हे, रविकिरण खवले, मनोज शिंगणापुरे, वैशाली सोनपरोते, प्रवीण ठाकरे, वैभव गवते, हेमंत कोटांबकर, ज्योती बकाले, सविता सुपटकर, सुनिता चौधरी, जयश्री शिमरे, स्वाती अजमिरे, शेषराव चव्हान, हनुमंत ठाकरे, ग्रंथपाल अविनाश डगवार, श्रीकांत देशमुख, व आदी प्रामुख्याने उपस्थित होते. प्रास्तविक धीरज जवळकार यांनी केले तर संचालन ज्योती राऊत यांनी केले.

ग्रंथ दिंडी ठरली लक्षवेधी

जुना धामणगाव येथील डॉ.मुकुंदराव के. पवार सैनिकी शाळेच्या विद्यार्थ्यांची ग्रंथ दिंडी समन्वयिका प्रा.जया केने यांच्या मार्गदर्शनात काढण्यात आली होती.ही ग्रंथ दिंडी लक्षवेधी ठरली.

मुख्य संपादक : सुरज वानखडे

Featured

Advertisement

Advertisement

error: Content is protected !!