प्रशासनाकडे आर्थिक नुकसान भरपाईची मागणी
धामणगाव रेल्वे
रामगावातील जीर्ण झालेल्या जुन्या समाजमंदिराची मागची भिंत कोसळल्याने त्यात गावातील महिला गीता नत्थूजी जाधव यांच्या घराचे संडास बाथरूम पूर्णतः जमीनदोस्त झाले असून महिलेचे मोठ्याप्रमाणात आर्थिक नुकसान झाले आहे. घरची परिस्थिती हलाखीची असल्याने नैसर्गिकरित्या अचानक ओढवलेल्या नुकसानाची भरपाई मिळण्यात यावी याकरिता प्रशासनाकडे अर्जाद्वारे मागणी करण्यात आली आहे.
दि. ७ जुलै २०२४ रोजी रात्रीच्या सुमारास अचानक समाजमंदिराची भिंत कोसळली असून समाजमंदिराला लागून असलेल्या गीता नत्थूजी जाधव यांच्या घरातील संडास बाथरूम पूर्णतः जमीनदोस्त झाले आहे तसेच गोठ्यात असलेल्या गाय व वासराला गंभीर दुखापत झाली असून गीता जाधव या महिलेलसमोर मोठा पेच निर्माण झाला आहे. करिता झालेल्या नुकसानीची तातडीने पाहणी करून आर्थिक मदत देण्यात यावी याकरिता ग्रामपंचायत, गटविकास अधिकारी तसेच तहसीलदार याना गीता नत्थूजी जाधव तसेच अल्पेश बन्सोड यांच्या वतीनं आज दि. ०८ जुलै २०२४ रोजी निवेदन देण्यात आले आहे..
Post Views: 79
Add Comment