तिवसा – प्रतिनिधी
कला व विज्ञान महाविद्यालय, कु-हा राष्ट्रीय सेवा योजना विभाग आणि शारीरिक शिक्षण विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने दि. २१ जुन २०२४ रोजी आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्यात आला.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. बी. आखरे हे होते. कार्यक्रमाची सुरुवात संत गाडगेबाबा यांच्या प्रतिमा पूजनाने करण्यात आली. कार्यक्रमाला मार्गदर्शक म्हणून लाभलेल्या साधना वाट (योगपटू तथा सामाजिक कार्यकर्त्या, अमरावती) यांनी आपल्या मार्गदर्शनात मान्यवरांनी जगभरात लोकप्रिय ठरत असलेल्या योगाचे मुळ हे भारत देशातच आहे. भारतीय प्राचीन संस्कृती आणि परंपरेत योगाला खूप महत्त्व होते. शारीरिक आणि मानसिक मजबुतीसाठी योगाचे अनेक फायदे आहेत. ही गोष्ट आज संपूर्ण जगाला पटली आहे. त्यामुळे जगभरात योगाला मान्यता मिळाल्याचे प्रात्यक्षिकासह सांगितले. तसेच योगा हा नियमित करावा असे आपण अनेकदा ऐकले असेल त्याचे योग्य परिणाम आणि लाभ मिळवण्यासाठी सातत्य ही गोष्ट महत्त्वाची आहे.
भारतीय योग परंपरा बऱ्याच वर्षापासून हळूहळू जगभरात पसरताना दिसत आहे. पण योग दिवस साजरा करण्याची सुरुवात झाली. ते अलीकडेच २७ सप्टेंबर २०१४ मध्ये भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संयुक्त राष्ट्राच्या महासभेच्या व्यासपीठावरून जगभरातील राष्ट्रांनी एकत्र येऊन योग दिवस साजरा करण्याचा संकल्प बोलून दाखविला होता. काही महिन्यातच हा प्रस्ताव संयुक्त राष्ट्र महासभेने मान्यही केला. त्यानंतर २०१५ पासून आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा करण्याची परंपरा सुरू झाली असल्याचे याप्रसंगी सांगितले. हा कार्यक्रम सुरेश मुंधडा , विजय डहाके, किसन ईखार यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक राष्ट्रीय सेवा योजना व कार्यक्रम अधिकारी डॉ. अजय अभ्यंकर यांनी केले. तर या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन कार्यक्रम अधिकारी डॉ. निशा जोशी यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विशेष परिश्रम डॉ. उमेश राठी यांनी घेतले
Post Views: 77
Add Comment