सामाजिक

योगा दिनानिमित्त वैशिष्टपूर्ण कार्यक्रम अंतर्गत योगा प्रात्यक्षिक आणि मार्गदर्शन शिबीर संपन्न

महाराष्ट्र कामगार कल्याण केंद्र धामणगाव रेल्वे च्या वतीने कार्यक्रमाचे आयोजन

धामणगाव रेल्वे –

दि. २१ जून २४ रोजी योगदिनानिम्मित महाराष्ट्र कामगार कल्याण केंद्र धामणगाव रेल्वे तसेच श्रीराम महाविद्यालय धा. रे. यांच्या संयुक्त विद्यमानाने वैशिष्टपूर्ण कार्यक्रम अंतर्गत योगा प्रात्यक्षिक आणि मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. त्यानिमित्ताने उपस्थितांना योग प्रात्यक्षिक करून दाखविले तसेच मानवाच्या आरोग्यासाठी योगा करणे अतिशय महत्वपूर्ण असल्याचे माहिती देण्यात आली.

सदर कार्यक्रमाचे आयोजन नंदलाल राठोड सहायक कल्याण आयुक्त व प्रतिभाताई भाकरे कामगार कल्याण आधीकरी यांच्या प्रमुख मार्गदर्शनखाली करण्यात आला असून सर्व प्रशिक्षकांना प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते शिवण क्लास प्रशिक्षण प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले.

सदर कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून प्रा. नितीन बिहाडे तर प्रमुख पाहुणे भूषण कांडलकर, येशूराज खोब्रागडे, नगोरवजी सरपंच, प्रफुल समरीत, वसंतराव वंजारी, मीराताई बडवाईक, योग प्रशिक्षक डॉ अभिजित पाचरे यांची प्रामुख्याने उपस्थिती होती. सदर कार्यक्रमयशस्वी करिता माधुरी गवई, अनिता गजभिये तसेच संपूर्ण स्टाफ अतिशय मेहनत घेतली. यावेळी कार्यक्रमाचे सूत्र संचालन प्रतीक्षा भुसारी हिने केले तर प्रास्तविक व आभार प्रदर्शन विनोद इंगळे केंद्र संचालक यांनी केले.

मुख्य संपादक : सुरज वानखडे

Featured

Advertisement

Advertisement

error: Content is protected !!