धामणगाव रेल्वे

सा.बां.विभाग नंतर आता महसूल प्रशासनही ऍक्शन मोडवर

प्रकरण; माजी सरपंच यांनी केलेल्या अतिक्रमणाचे

धामणगाव रेल्वे

गेल्या काही दिवसांपासून विरूळ रोंघे गावात माजी सरपंच अतुल वाघ यांनी  केलेल्या अतिक्रमणाचा मुद्दा तापलेला आहे. माजी सरपंच यांनी विविध विभागातील जागेवर केलेल्या अतिक्रमणाच्या तक्रारीवरून सा.बा. विभागाने प्रत्यक्ष पाहणी केले असता मुख्य रस्त्यापासून ९ मीटर अतिक्रमण केले असल्याचे निष्पन्न झाले होते. त्यानुसार सदरील अतिक्रमण १५ दिवसाच्या आत काढण्यात यावे. अशी नोटीस माजी सरपंच याना देण्यात आली होती. तर दुसरीकडे महसूल आणि ग्रामपंचायत प्रशासन सदरच्या अतिक्रमणाबाबत कार्यवाहीसाठी कोणतेही पाऊले उचलले नसल्याने महसूल आणि ग्रा. प. प्रशासनाची कार्यवाही थंडबस्त्यात असल्याची बातमी जनसूर्या ने प्रकशित केली होती.
त्यानुसार सदर बातमीची महसूल प्रशासनामार्फत दखल घेत मंडळ अधिकारी आणि तलाठी यांना २८ मे रोजी प्रत्यक्ष मोक्कापाहणी करून अहवाल सादर करण्यात सांगितले असून याबाबत ३० मे रोजी प्रकरण सुनावणीकरिता ठेवण्यात आले आहे.

महसूल प्रशासनाच्या मोक्का पाहणीदरम्यान तक्रारदार आणि माजी सरपंच यांच्या शाब्दिक वाद

तहसीलदार यांच्या आदेशावरून विरूळ रोंघे येथील माजी सरपंच यांनी केलेल्या अतिक्रमणाची प्रत्यक्ष मोक्का पाहणी करण्यासाठी मंडळ अधिकारी आणि तलाठी आले असता माजी सरपंच यांनी शेताला लागून असलेल्या दोन बाजूस अंदाजे १० फूट अतिक्रमण केले असल्याचे निष्पन्न झाले. त्या दरम्यान माजी सरपंच अतुल वाघ आणि तक्रारदार ग्रा. प. सदस्य मंगेश गुल्हाने यांच्यात शाब्दिक चकमक झाल्याची माहिती प्राप्त आहे.

ग्राम पंचायत प्रशासनाची अतिक्रमण कार्यवाहीसाठी चालढकल

माजी सरपंचाने केलेल्या अतिक्रमणामुळे ग्रा. प. सदस्य तसेच गावकऱ्यांनी संबंधितांना तक्रारी केले असताना सा. बां. विभाग तसेच महसूल विभागाने कार्यवाही सुरु केली. मात्र ग्रा. प. प्रशासन  सदरच्या विषयाकडे कानाडोळा करीत असल्याची चर्चा विरुळात रंगली आहे.  एकीकडे शालेय विध्यार्थ्यांसाठी बसेस सुरु व्हाव्या या करिता अतिक्रमणामुळे अडथडा येत असल्याने तरोडा ग्रा. प. ने ठराव घेऊन संबंधित विभागाकडे रस्ता मोकळा करून देण्याची मागणी केली आहे मात्र स्थानिक ग्रा. प. विरूळ रोंघे यांनी दोन आठवड्याअगोदर प्राथमिक नोटीसीनंतर कुठलीही कार्यवाही केली नसल्याची माहिती आहे..

 

अतिक्रमणाबाबत सदस्य तसेच ग्रामस्थांच्या तक्रारी प्राप्त आहे, त्यानुसार गैर अर्जदारांना प्राथमिक नोटीस बजावण्यात आली आहे. मात्र गावठाण ची नेमकी हद्द कुठपर्यंत आहे हे माहित नसल्यामुळे गावठाण मोजणीसाठी भूमिअभिलेख कार्यालयात मोजणीसाठी अर्ज टाकण्यात येणार आहे.
      ग्रामसचिव केने, ग्रा. प. विरूळ रोंघे

 

आजच्या मोक्का पाहणी बाबत मला माहिती नव्हती, सदरच्या अतिक्रमणाबाबत काल झालेल्या मासिक मिटिंग मध्ये चर्चा करण्यात आली, त्यानुसार नझूल ऑफिस मध्ये गावठाण मोजणीसाठी अर्ज करून पुढील कार्यवाही करण्यात येईल..
    रुपेश गुल्हाने, सरपंच – ग्रा. प. विरूळ रोंघे

 

गावातील नागरिकांनी मला निवडून दिले असताना त्यांच्यावर होणारा अन्याय मला सहन होत नसल्याने मी सातत्याने या प्रकरणात पाठपुरावा करीत आहे. माझी लढाई कागदोपत्री सुरु असताना आज रोजी मोक्का पाहणी दरम्यान माजी सरपंच यांनी त्या गोष्टीची राग मनात धरून मला अश्लील शिवीगाळ करीत पाहून घेण्याची धमकी दिली. मात्र अशा पोखर धमक्यांना मी भीक घालीत नसून माझे कर्तव्य मी पार पाडत राहणार…
   मंगेश गुल्हाने, ग्रा. प. सदस्य विरूळ रोंघे

मुख्य संपादक : सुरज वानखडे

Featured

Advertisement

Advertisement

error: Content is protected !!