वर्धा प्रतिनिधी –
वर्धा पोलिस ठाण्याच्या हद्दीतील एका गावातील अल्पवयीन मुलीचे आतेभावा सोबत प्रेम संबंध होते. त्यातूनच ती गर्भवती असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार अल्पवयीन मुलीची प्रकृती बिघडल्याने तीला शनिवारी हिंगणघाट येथील खाजगी रुग्णालयात दाखल केले असता ती गर्भवती असल्याची बाब डॉक्टरांच्या निदर्शनास आली. डॉक्टरांनी यासंबंधी पोलिसांनी माहिती दिली.
पोलिसांनी मुलीला ताब्यात घेऊन तिचे मेडिकल करून विचारपूस केली असता तिचा आतेभाऊ सेलू तालुक्यातील सुरगाव रेहकी येथील मंगेश सहारे याचे प्रेमसंबंध होते. यातून हा प्रकार झाल्याची माहिती मुलीने दिली. यासंबंधी गिरड पोलिस ठाण्यात पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला.
पुढील तपास उपविभागीय पोलिस अधिकारी रोशन पंडित, ठाणेदार संदीप गाडे यांच्या मार्गदर्शनात पोलिस उपनिरीक्षक गोमेद पाटील करीत आहे.
Post Views: 89
Add Comment