मुंबई – जनसूर्या मीडिया
पुण्यातील हिट अँड रन प्रकरण सध्या चर्चेत आहे. या अपघातात अल्पवयीन आरोपीनं पोर्शे गाडीखाली दोघांना चिरडल्याची घटना घडली आहे. अपघातानंतर पोलिसांनी केलेली कारवाई आणि त्यानंतर आरोपीला मिळालेला जामीन यांमुळे हे प्रकरण संपूर्ण देशभरात पोहोचलं. अशातच आता विद्येचं माहेरघर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुण्याप्रमाणेच राज्याची राजधानी मुंबईत अपघात झाला आहे. या अपघातात एका अल्पवयीन मुलानं दुचाकीनं एका ३२ वर्षीय तरुणाला धडक दिली. या अपघातात ३२ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला आहे. मुंबईतील माझगाव परिसरात एका अल्पवयीन मुलानं दुचाकीनं एका ३२ वर्षीय तरुणाला धडक दिली आहे. दुचाकीच्या धडकेत ३२ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला आहे. गुरुवारी सकाळी सातच्या सुमारास ही घटना घडल्याचं सूत्रांनी सांगितलं आहे. एक १५ वर्षांचा मुलगा बाईक चालवत होता आणि त्यानं ३२ वर्षांच्या माणसाला धडक दिली.
मिळालेल्या माहितीनुसार, या घटनेत इरफान नवाब अली शेख नावाचा व्यक्ती गंभीर झाला. अपघातानंतर या व्यक्तीला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं. भायखळा येथील जेजे रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आलं. पण उपचारादरम्यान या व्यक्तीचा मृत्यू झाला.
मुंबईत अल्पवयीन दुचाकीच्या धडकेनं एका व्यक्तीचा मृत्यू
मुंबईत रस्ते अपघातात एका व्यक्तीचा मृत्यू झाल्यानंतर पोलिसांनी याप्रकरणी कारवाई केली आहे. जेजे मार्ग पोलिसांनी अल्पवयीन मुलासह त्याचे वडील जावेद शफीक अहमद शेख यांना ताब्यात घेतलं आहे. या घटनेनंतर जेजे मार्ग पोलिसांनी आयपीसीच्या कलम ३०४ (२)आणि मोटार वाहन कायद्याच्या कलम ३, ४ अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
पुण्यात अल्पवयीन मुलानं पोर्शे कारनं दोघांना चिरडलं
पुण्यात रविवारी (१९ मे) एका १७ वर्षाच्या मुलानं दुचाकीवरून जाणाऱ्या दोन इंजिनिअर्सना त्याच्या पोर्शे कारनं चिरडलं होतं. कार चालवणारा अल्पवयीन दारूच्या नशेत होता. या भीषण रस्ते अपघातात दोन्ही इंजिनिअर्सचा मृत्यू झाला. अनिश अवधिया (२४ वर्ष) आणि अश्विनी कोष्टा (२४ वर्ष) अशी मृतांची नावं आहेत. दोघेही मध्य प्रदेशातील रहिवासी असून पुण्यात कामाला होते. या प्रकरणात बाल न्याय मंडळानं अल्पवयीन आरोपीला काही अटींसह सोडलं होतं. पुण्यातील प्रसिद्ध बिल्डरचा हा मुलगा असल्याची बाब समोर आली आहे. याप्रकरणी अल्पवयीन आरोपीचे वडील विशाल अग्रलवालला अटक करण्यात आली आहे.
Post Views: 64
Add Comment