अमरावती

दिव्यांग व्यक्तीबद्दल जागरूक व्हा – जितेंद्र शेटिये

वरूड प्रतिनिधी –  निलेश निंबाळकर

अमरावती/ वरूड :

समाजातील बराचसा घटक अजूनही दिव्यांग बद्दल तेवढा जागरूक नाही पालकांना आपलं मूल दिव्यांग आहे हे कळल्यावर ते मानायला तयार नसतात घरची मोठी मंडळी म्हणतात थोडा मोठा झाला की होईल तो बरा तू पण तर लहानपणी उशिरा चालायला बोलायला शिकला परंतु आता पहा नोकरी करतो घर संसार सांभाळतो गरिबी अज्ञान चुकीची माहिती सोयी सुविधांचा अभाव गैरसमज यामुळे समाजातील बरेचसे लोक अंधश्रद्धेकडे वळतात.
माझ्या मुलाला कोणी जादूटोणा केला असेल करणी केली असेल म्हणून तांत्रिक वर त्यांचा विश्वास बसतो व ते आपल्या मुलाला त्यांच्याकडे घेऊन जातात त्यामुळे दिव्यांगाच्या विकासाला उशीर होतो जर पालकांनी आपल्या मुलाचे दिव्यांगत्व वेळीच ओळखले व त्याच्यावर वैद्यकीय उपचार केले तर दिव्यांगाची तीव्रता कमी करण्यास नक्कीच मदत होते.
     दिव्यांगाचे २१ प्रकार आहेत परंतु मुख्यतः दिव्यांग चार प्रवर्गात मोडतात अंध प्रवर्ग, अस्थिव्यंग प्रवर्ग, मूकबधिर प्रवर्ग व बौद्धिक अक्षम दिव्यांग प्रवर्ग. पालकांनी जागरूक होऊन वेळीच आपल्या मुलाचे दिव्यांगत्व ओळखून त्यांना त्या प्रवर्गात शिक्षणाची संधी मिळवून दिल्यास त्यांच्या सर्वांगीण विकासाला मदत होईल.

मुख्य संपादक : सुरज वानखडे

Featured

Advertisement

Advertisement

error: Content is protected !!