५ महिला जखमी ; नागपूर ला हलविले…
धामणगाव रेल्वे –
कामानिमित्त नागपूर वरून धामणगावला आलेल्या महिला परत नागपूर ला जात असताना मंगरूळ बायपास रोडवर देवा रेस्टोरेंट नजीक वळण रस्त्यावर महिलांच्या वाहनाचा आज दुपारी २ : ४५ ते ३ च्या सुमारास अपघात घडल्याची घटना घडली. सदर अपघात एवढा भयंकर होतो कि, चारचाकी वाहन ३ ते ४ पलटी घेत रोडलगत असलेल्या खाईत शिरले. मात्र सुदैवाने कोणतीही जीवित हानी झाली नाही. तर सदरच्या अपघातात अनुसया शर्मा वय – १७, शीतल शर्मा वय – ३६, मालविका क्षीरसागर वय – २७, निकिता इंगोले वय – ३२, लक्ष्मी कपूर वय – ५० रा. सर्व नागपूर असे जखमी झालेल्या महिलांचे नाव आहे.
महिलांच्या मदतीसाठी देवानंद आला धावून
सदरची घटना मंगरूळ बायपास रोडवर देवा रेस्टोरेंट जवळ घडली असल्याने देवानंद जवंजाळ तसेच त्याचा मित्र तातडीने घटनास्थळी पोहचून त्यांनी अपघातातील सर्व महिलाना बाहेर काढून तात्काळ ग्रामीण रुग्णालयात हलविले. डॉक्टरांनी सर्व महिलांना प्राथमिक उपचार देऊन पुढील उपचाराकरिता नागपूर येथे रेफर केले. तर कोणत्याही महिलांना गंभीररित्या जखम नसल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
सदरचा अपघात महिला वाहन चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने झाला असावा असा प्राथमिक अंदाज लावण्यात येत आहे . तर अपघातातील वाहनांची स्थिती बघून देव तारी त्याला कोण मारी अशी प्रचिती प्रत्येक बघणाऱ्या व्यक्तीच्या मुखातून निघत होती.
Post Views: 135
Add Comment