शेती विषयक

रिलायन्स पिक विमा कंपनी प्रतिनिधींची जिल्हाधिकारी कडून कान उघाडणी

चिंचपूर, तुळजापूर, बऱ्हाणपूर येथील शेतकऱ्याच्या पिक विमा सर्वे फॉर्मवर खोट्या सह्या मारल्याचे प्रकरण

धामणगाव रेल्वे –

तालुक्यातील चिंचपूर, तुळजापूर, बऱ्हाणपूर येथील शेतकऱ्यांचे झालेले नुकसानीचे सर्वे फॉर्मवर रिलायन्स कंपनीच्या प्रतिनिधी खोट्या सह्या मारून झालेले नुकसान न दाखविल्याने येथील शेतकऱ्यांनी याबाबत सातत्याने धामणगाव रेल्वे कृषी ऑफिस तथा तहसील कार्यालय धामणगाव रेल्वे यांच्याकडे पाठपुरावा केला होता. मात्र न्याय न मिळाल्याने येथील शेतकऱ्यांनी जिल्हा कृषी अधिकारी सातपुते यांच्याकडे धाव घेऊन न्याय देण्याची मागणी केली होती.

सदरचे प्रकरण गंभीर असल्या कारणाने कृषी अधिकारी यांनी शेतकरी सह रिलायन्स कंपनी प्रतिनिधी यांची जिल्हाधिकारी सोबत आज दिनांक १७ मे २०२४ रोजी मिटिंग आयोजित केली होती. मिटिंग मध्ये पिक विमा चे अभिलाष नरावडे व राजु सुर्यवंशी दोन प्रतिनिधी हजर असून स्वतः जिल्हा कृषी अधीक्षक सातपुते व तक्रारकर्ते शेतकरी पवन अ .लांबाडे, राहुल बांबल, अभिजीत लांबाडे , पवन निकम, महेन्द्र गायकवाड सोमेश्वर ठाकरे उपस्थित होते.

यावर जिल्हा कृषी अधीक्षक सातपुते यांनी जिल्हाधिकारी यांच्यासमोर सदरचा विषय मांडला तसेच तक्रार कर्त्यांनी सुद्धा घडलेली आपबिती जिल्हाधिकाऱ्यांकडे कथन करून आम्हा सर्व शेतकऱ्यांची झालेल्या नुकसानीचे भरपाई देण्याची मागणी केली. त्यावर रिलायन्स पिक विमा कंपनीच्या प्रतिनिधींनी आपल्या बाजूमध्ये आमच्या प्रतिनिधींनी शेतकऱ्यांच्या फॉर्म वर खोट्या सह्या मारल्याची चूक कबुल केली असून पुन्हा सर्वे करून शेतकऱ्यांची नुकसान भरपाई देतो म्हटले.

परंतु जिल्हाधिकारी यांनी त्यांची मागणी पूर्णपणे फेटाळून लावली असून रिलायन्स कंपनीच्या प्रतिनिधी यांची चांगलीच कान उघाडणी केली तसेच जिल्हाधिकारी यांनी शेतकऱ्यांच्या मागणीनुसार तुम्ही ८ दिवसात त्यांना मदत दया तसे न झाल्यास कंपनीवर गुन्हा दाखल करण्यात येईल स्पष्ट शब्दात निर्देश दिले असल्याचे तक्रारकर्ते यांनी सांगितले.

मुख्य संपादक : सुरज वानखडे

Advertisement

Advertisement

error: Content is protected !!