माना येथे पुरवठा निरीक्षक भावना दत्ताळे यांची धडक कारवाई
मूर्तिजापूर – प्रतिनिधी
गरीब नागरिकांना स्वस्त धान्य दुकानातील मिळणारा तांदूळ हा गावोगावी जाऊन त्यांच्याकडून अवैधरित्या कमी भावात विकत घेऊन तो मोठ्या दराने मार्केट मध्ये विकण्याचा गोरखधंदा सध्या अनेक ठिकाणी सुरु असताना मूर्तिजापूर तालुक्यातील माना येथील लाभार्थ्यांकडून रेशनचा तांदूळ अवैधपणे विकत घेत असताना दोन वाहनावर धडक कार्यवाही करण्यात आली. सदरची कार्यवाही पुरवठा निरीक्षक भावना दत्ताळे यांनी केली आहे.
माना परिसरात अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या अवैद्यपणे लाभार्थ्यांकडून गहू, तांदूळ, कमी भावात विकत घेऊन ते बाहेर जास्त भावात विकून रेशन तस्कर हे परिसराततील गावोगावी गाड्या फिरवून कंट्रोल दुकान च्या लाभार्थ्यांकडून अवैद्यपणे शेकडो क्विंटल तांदूळ जमा करून बाहेरगावी ज्यादा भावाने विकून मलिदा जमा करतात. तर काही लाभार्थी हे तांदुळाच्या बदल्यात गहू व्यापाऱ्यांकडून विकत घेतात.
असाच काहीसा प्रकार माना येथे सारी को दिन किया मुद्दिन, मोहम्मद आसिफ मोहम्मद युसुफ, यांना एम एच २९ एम २३५२, व एम एच २७ पी २२३१ या गाड्या द्वारे तांदूळ विकत घेत होते. गाडी चालक नितीन दीपक आठवले यांच्याद्वारे अवैद्य तांदूळ विक्री वाहतूक करताना माना मंडळ अधिकारी प्रफुल काळे, माना तलाठी गणेश भारती, व तहसील पुरवठा निरीक्षक भावना दत्ताळे यांनी ही कारवाई करून सदरचा माल मूर्तीजापुर येथे गोडाऊन मध्ये जमा करण्यात आल्या आहेत तर दोन्ही वाहन हे माना पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले.
धामणगाव रेल्वे तालुक्यात कार्यवाही कधी ?
अवैध धान्य खरेदी विक्रीचा गोरखधंदा धामणगाव तालुक्यात सुद्धा मोठ्या प्रमाणात सुरु असून यावर अद्यापही प्रशासनाने कुठली दखल घेतली नाही. त्यामुळे सर्रासपणे खेड्यापाड्यात खुलेआम अवैधपणे रेशनच्या च्या धान्याची खरेदी विक्री होताना दिसत आहे. यावर अंकुश लावणेही तेवढेच गरजेचे झाले असताना धामणगाव तालुक्यात कार्यवाही कधी असा प्रश्न सर्वसामान्यांना पडला आहे.
Post Views: 87
Add Comment