धामणगाव रेल्वे

धामणगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये तीळ खरेदी शुभारंभ

नवीन तिळाला मिळाला १२ हजार ७०० भाव

धामणगाव रेल्वे-

         येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये तीळ खरेदी शुभारंभ शनिवारला (ता.११) करण्यात आला. शुभारंभ प्रसंगी १२ हजार ७०० प्रती क्विंटल भाव मिळाला. बाजार समितीमार्फत तीळ खरेदी सुरू केल्याने उत्पादकांना दिलासा मिळाला आहे.
        धामणगाव व परिसरातील शेतकऱ्यांना तीळ या शेतमालाची विक्री करण्याकरिता अमरावती, यवतमाळ,नागपूर या ठिकाणी नेऊन विक्री करावी लागत होती. त्यामुळे शेतकरी बंधूंना आपला शेतमाल बाहेर ठिकाणी नेल्यामुळे मिळेल त्या भावात विकावे लागत होते.शेतकरी बंधूची होत असलेली असुविधा लक्षात घेता व शेतकरी बंधूंच्या सुविधेकरिता शेतकऱ्यांना त्यांच्या शेतमालाचा योग्य भाव मिळावा या उद्देशाने समितीचे सचिव प्रवीण वानखडे यांच्या पुढाकाराने येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत नवीन तीळ खरेदीचा शुभारंभ सचिव प्रवीण वानखडे यांच्या हस्ते करण्यात आला.
यावेळी उपस्थित जावरा येथील भोजराज देशमुख, जुना धामणगाव येथील सचिन भारती, रफिक पठाण,बग्गी येथील सुमित खराबे, वाढोणा येथील अमोल निखाडे, नरेंद्र जूनघरे व आदी शेतकऱ्यांचा मान्यवरांच्या हस्ते शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. नवीन तीळ खरेदी शुभारंभाला राधेश्याम चांडक, गिरीश भुतडा,अशोक कांकरिया, राजेश गंगन,राजेंद्र पनपालिया, आडते असोसिएशनचे अध्यक्ष सुरेंद्र जयस्वाल, देवराव कापसे, सचिन मुंदडा, संतोष लाहोटी, मनीष केला, प्रदीप राठी, भूषण राठी, जगदीश रॉय, अमोल रॉय, नंदलाल राठी, मुकेश पनपालिया व आदी उपस्थित होते.
नवीन तीळ खरेदी शुभारंभ प्रसंगी शेतकरी अमोल निखाडे यांच्या तिळाला १२ हजार ६४० रुपये भाव मिळाला खरीदेदार सचिन राठी हे होते. तसेच जुना धामणगाव येथील शेतकरी सचिन भारती यांच्या तिळाला १२ हजार २७५ रुपये, बग्गी येथील शेतकरी मोरेश्वर गोळे यांच्या तीळाला सर्वाधिक १२ हजार ७०० दर मिळाला. खरेदीदार संजय अग्रवाल, राजेंद्र अग्रवाल,सचिन राठोड इत्यादी उपस्थित होते. यावेळी बाजार समितीचे दिनेश गोमासे, नाना गाडेकर, नितीन मांडवगणे, कवीश मोहिते, दिलीप पाटील, संजय तुपसुंदरे उपस्थित होते.
              याप्रसंगी उपस्थित शेतकऱ्यांनी सांगितले की, धामणगाव कृषी उत्पन्न बाजार समिती शेतकरी वर्गाच्या हितासाठी तसेच सुरू केल्याने आम्हाला आता बाहेरगावी जावे लागणार नाही.तसेच योग्य भाव मिळाल्याबद्दल बाजार समितीचे आभार मानले.

मुख्य संपादक : सुरज वानखडे

Featured

Advertisement

Advertisement

error: Content is protected !!